चुकूनही विमान प्रवासात हे पिऊ नका...; एअर होस्टेसचा अनुभव, प्रवाशांना केलं सतर्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 17:53 IST2025-01-11T17:52:50+5:302025-01-11T17:53:34+5:30
तिने वेगवेगळ्या एअरलाईन्स कंपनीसोबत ६ वर्षाहून अधिक काळ काम केले आहे.

चुकूनही विमान प्रवासात हे पिऊ नका...; एअर होस्टेसचा अनुभव, प्रवाशांना केलं सतर्क
विमान प्रवास करणं हे सर्वसामान्यांचे स्वप्न असते, काहींना ते जमते तर काहींना जमत नाही. विमान प्रवासाबाबत अनेकांनाच उत्सुकता असते. त्यातच एअर होस्टेस म्हणून काम केलेल्या डिजिटल क्रिएटर कॅट कमलानी हिने तिचा विमानात काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे. त्यात विमान प्रवासावेळी कुठलेही पेय पिण्यापासून टाळावं असा सल्ला तिने दिला आहे. कॅटने तिच्या इन्स्टाग्राम रिलवर फोलोअर्सला नेहमी फ्लाईटमध्ये बॉटेल किंवा कॅनमधूनच पाणी प्यावं. विमानात कधीही द्रवपदार्थ सेवन करू नका असं सांगत माजी फ्लाईट अटेंडंटने दिलेले कारण खूपच धक्कादायक आहे.
कॅट ही २ मुलांची आई आहे. त्यासोबत ती कन्टेंट क्रिएटर म्हणूनही काम करते. तिने वेगवेगळ्या एअरलाईन्स कंपनीसोबत ६ वर्षाहून अधिक काळ काम केले आहे. या काळात तिला आलेले अनुभव तिने सोशल मीडियावरील चाहत्यांसाठी सांगितले आहे. त्यात फ्लाईटमधील पाण्याची टाकी कदाचितच साफ केली जाते, ती खूप घाण असते. हेच पाणी कॉफी अथवा चहा बनवण्यासाठी वापरले जाते त्यामुळे आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो असं रिलमध्ये सांगितले आहे.
कॅटने विमानात वापरल्या जाणाऱ्या कॉफी मशिनकडे इशारा करत ही मशीन तोपर्यंत व्यवस्थित साफ केली जात नाही जोपर्यंत ती खराब होत नाही. उड्डाणावेळी मशीनमधील पॉट बदलले जातात परंतु पूर्ण मशीन योग्यरित्या साफ होत नाही. त्याचसोबत पाण्याची मशीन बहुतेकदा विमानाच्या टॉयलेटजवळ असते. ज्यामुळे संसर्ग पसरण्याचा धोका वाढतो असंही कॅटने तिच्या रिल्समध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, कॅटने लहान मुलांच्या पालकांनाही सल्ला दिला आहे. जे आई वडील मुलांसाठी बॉटेलमध्ये दूध बनवू इच्छितात त्यांनी कधीही गरम पाणी मागवून बॉटेलमध्ये टाकू नये. त्याऐवजी बॉटलबंद पाणी किंवा वेगळे गरम पाण्याचा कप घ्याल. बॉटेल बंद पाण्याला गरम पाण्याच्या कपात टाकून लहान मुलांसाठी दूध तयार करा असं कॅटने सांगितले. मागील वर्षी अशाच एका एअर होस्टेसने फ्लाईटमध्ये वापरले जाणारे हॉट वॉटर पॉट्स कदाचितच पूर्णपणे साफ केले जातात. फ्लाईटमध्ये केवळ थंड पाण्याचे सेवन करा, एअरपोर्टवर बोर्डिंग करण्याआधी एखाद्या वेंडरकडून गरम पाणी भरून घ्या असं सांगितले होते.