पावसाळ्यात गाड्या चिखल उडवत असतील तर घाबरु नका, या व्हिडिओत दडलाय उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 06:36 PM2021-07-16T18:36:40+5:302021-07-16T18:45:27+5:30

पावसामुळे रस्त्यात चांगलाच चिखल झालेला असतो त्यातून वाट काढत निघणे म्हणजे डोक्याला ताप. अशावेळी बाजूने गाड्या जात असती तर कपड्यांची जी काही हालत होते की विचारू नका. यावर एका तरुणीने अशी शक्कल लढवलीये ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल...

Don't panic if the cars are blowing mud in the rain, the solution hidden in this video | पावसाळ्यात गाड्या चिखल उडवत असतील तर घाबरु नका, या व्हिडिओत दडलाय उपाय

पावसाळ्यात गाड्या चिखल उडवत असतील तर घाबरु नका, या व्हिडिओत दडलाय उपाय

Next

पावसाळ्यात रस्त्यातून चालणे म्हणजे जिकिरीचे काम असते. पावसामुळे रस्त्यात चांगलाच चिखल झालेला असतो त्यातून वाट काढत निघणे म्हणजे डोक्याला ताप. अशावेळी बाजूने गाड्या जात असती तर कपड्यांची जी काही हालत होते की विचारू नका. तुम्ही सर्वजण या त्रासातून गेला असाल. पण यावर तुम्ही उपाय शोधण्याचा विचार केला आहे का? केला नसेल तर हा व्हिडिओ नक्की पाहा. तुम्हाला लगेच उपाय सापडेल. तुम्हाला उपायही सापडेल आणि तुम्ही पोट धरून हसालही...


पावसाळ्यात चिखलाने भरलेल्या रस्त्यावरून जाताना बाजूने जाणाऱ्या कारचे पाणी अंगावर उडू नये म्हणून एका तरुणीने चांगलीच शक्कल लढवली. तिने असा काही जुगाड केला की तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल. इतकच नव्हे तर हा जुगाड तुम्ही तुमच्या आयुष्यातही करू शकता.

आयपीएस अधिकारी रुपीन शर्मा यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओतील तरुणी चिखलाने भरलेल्या रस्त्यावरून जात असते. अचानक तिच्या बाजूने गाडी येते. ती प्रसांगवधान दाखवते आणि चटकन निर्णय घेते. चालता चालता रस्त्यात मिळालेला भला मोठ्ठा धोंडा ती उचलते आणि उभी राहते. गाडीवाला त्या धोंड्याकडे आणि तरुणीकडे बघुन हळूहळू गाडी चालवत जातो. आहे की नाही आयडियाची उत्तम कल्पना?

Web Title: Don't panic if the cars are blowing mud in the rain, the solution hidden in this video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.