तुमच्या मोबाईल 'हा' मॅसेज आला तर काळजी करू नका?; जाणून घ्या कारण

By Appasaheb.patil | Published: July 20, 2023 11:54 AM2023-07-20T11:54:11+5:302023-07-20T11:55:29+5:30

या मॅसेजबद्दल लोकांमध्ये विविध विषयावर चर्चा होत असून शिवाय सोशल मिडियावर या मॅसेजबद्दल विविध प्रकारच्या मिम्स् फेसबुक, व्हॉटसअप, इन्स्टाग्रामवर पोस्ट झाल्या आहेत. 

Don't worry if you get emergency alert message on your mobile?; Find out why | तुमच्या मोबाईल 'हा' मॅसेज आला तर काळजी करू नका?; जाणून घ्या कारण

तुमच्या मोबाईल 'हा' मॅसेज आला तर काळजी करू नका?; जाणून घ्या कारण

googlenewsNext

सोलापूर : सकाळी १०.३० वाजता इंग्रजीमध्ये सर्वांना एक इमर्जन्सी अलर्ट मिळाला.. त्यानंतर काही वेळाने, १०.३१ वाजता मराठीमध्ये देखील पुन्हा एकदा असा अलर्ट मिळाला..सर्वांच्याच मोबाईलवर एकाच वेळी आवाज झाल्यानं लोकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला. एकमेकांना फोनवरून या मॅसेजबाबत विचारणा लोक करू लागले. दरम्यान, याबाबत माहिती मिळाली आहे की,  सध्याचा अलर्ट हा केवळ चाचणी म्हणून होता, त्यामुळे गोंधळून जाण्याचं किंवा काळजीचं काही कारण नाही.

दरम्यान, या मॅसेजबद्दल लोकांमध्ये विविध विषयावर चर्चा होत असून शिवाय सोशल मिडियावर या मॅसेजबद्दल विविध प्रकारच्या मिम्स् फेसबुक, व्हॉटसअप, इन्स्टाग्रामवर पोस्ट झाल्या आहेत. याबाबत अधिकची माहिती समोर आली आहे की, देशभरातील लोकांच्या स्मार्टफोनवर सकाळी १०.२० वाजेच्या सुमारास एक इमर्जन्सी अलर्ट आला. तुमच्याही मोबाईलवर असा अलर्ट आला असेल, तर काळजी करण्याची गरज नाही. सध्या कोणताही धोका आलेला नसून, ही केवळ एक चाचणी होती. केंद्र सरकारच्या टेलिकम्युनिकेशन विभागाने हा अलर्ट जारी केला होता. या माध्यमातून आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये, किंवा मोठ्या संकटावेळी देशातील सर्व नागरिकांना एकाच वेळी सूचना देण्याच्या यंत्रणेची चाचणी घेण्यात आली. यामुळे भविष्यात अशी परिस्थिती निर्माण झाल्यास सर्व नागरिकांना वेळेत अलर्ट मिळणार असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Don't worry if you get emergency alert message on your mobile?; Find out why

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.