अरे बापरे..! नशेत असताना त्यानं केलं असं काही की ११ हजारांचे झाले तब्बल २० लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2022 04:12 PM2022-06-12T16:12:20+5:302022-06-12T16:12:56+5:30

आपलं नशीब कधी चमकेल हे कोणी सांगू शकत नाही. असंच काहीसं एका व्यक्तीसोबत घडलं.

drunk man made 20 lakh rupees from 11 thousand rs in horse trading race social media trending story | अरे बापरे..! नशेत असताना त्यानं केलं असं काही की ११ हजारांचे झाले तब्बल २० लाख

अरे बापरे..! नशेत असताना त्यानं केलं असं काही की ११ हजारांचे झाले तब्बल २० लाख

Next

आपलं नशीब कधी चमकेल हे कोणी सांगू शकत नाही. असंच काहीसं एका व्यक्तीसोबत घडलं. त्यानं दारूच्या नशेत असं काही केलं की त्याचं नशीबच चमकलं. त्यानं दारूच्या नशेत एका घोड्यावर पैज लावली. इतकंच काय तर त्यानं ज्या घोड्यावर पैज लावली तो घोडा दूर दूरपर्यंत जिंकण्याचीही शक्यता नव्हती. पण अचानक एक चमत्कार झाला आणि ती व्यक्ती लखपती बनली. विजयानंतर त्यांची एक मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, ही घटना ऑस्ट्रेलियातील आहे. जिथे जारोड (Jarrod) नावाच्या व्यक्तीने घोड्यांच्या शर्यतीत एका घोड्यावर ११ हजार रुपयांची पैज लावून सुमारे 20 लाख रुपये (£20,000) जिंकले. विशेष म्हणजे जारोडने दारूच्या नशेत ही पैज लावली. इतकेच नाही तर तो घोडा शर्यत जिंकण्याची शक्यता नगण्य होती, कारण तो शर्यतीत 180-1 ने पिछाडीवर होता.


पैज लावल्यानंतर, जारोडला कल्पनाही नव्हती की तो ती पैज जिंकू शकेल. पण रेसकोर्सवरील घोषणेच्या वेळी आश्चर्यकारकपणे विजेते म्हणून आपले नाव ऐकून जारोडला आनंद झाला. जारोडने शुक्रवारी याबाबत एक मुलाखत दिली. त्याची ही मुलाखत आता चर्चेचा विषय ठरत आहे.

मित्रांसोबत गेला होता बाहेर
Racing.Com ला दिलेल्या मुलाखतीत जरोडने सांगितलं की, त्या दिवशी माझ्याकडे फक्त 14-15 हजार रुपये होते. मी मित्रांसोबत बिअर पीत होतो. मग एक फेरफटका मारून रेसकोर्सजवळ पोहोचलो. आम्ही असंच मजेमजेत त्या घोड्यावर पैज लावली. जेव्हा पैसे कमी पडले तेव्हा आम्ही थोडे थोडे करून एकत्र जमवले. शेवटी असे झाले की आमच्या घोड्याने £20,000 पेक्षा जास्त बक्षीस जिंकले. हे सर्व माझ्या आई आणि वडिलांसाठी आहे, असंही त्यानं मुलाखतीदरम्यान सांगितलं.

Web Title: drunk man made 20 lakh rupees from 11 thousand rs in horse trading race social media trending story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.