Viral Video: चालत्या गाडीच्या बोनेटवर बसून ऐटीत पित होता दारु, काही वेळातच घडलं धक्कादायक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 05:15 PM2022-03-21T17:15:07+5:302022-03-21T17:17:40+5:30

व्हायरल झालेला हा व्हिडिओ राजस्थानमधील जयपूरचा आहे, ज्यामध्ये हे सर्व लोक रस्ता सुरक्षेचे जवळपास सर्व नियम तोडताना दिसत आहेत.

drunk man on car bonnet video goes viral on internet | Viral Video: चालत्या गाडीच्या बोनेटवर बसून ऐटीत पित होता दारु, काही वेळातच घडलं धक्कादायक

Viral Video: चालत्या गाडीच्या बोनेटवर बसून ऐटीत पित होता दारु, काही वेळातच घडलं धक्कादायक

googlenewsNext

तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की धुलवडीच्या दिवशी लोक खूप धमाल करतात (Holi Viral Video). यादरम्यान अनेकजण नशेत राहून ठिकठिकाणी पडतानाही दिसतात. यामुळे दरवर्षी प्रशासनाकडून लोकांना खबरदारी घेण्याचा सल्ला दिला जातो. पण काही लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, जो धुलवडीशी संबंधित आहे.

व्हिडिओमध्ये (Shocking Video Viral) मॉडिफाईड मारुती सुझुकी झेनमध्ये ८ लोक बसलेले दिसत आहेत. त्यापैकी एक व्यक्ती गाडीच्या बोनेटवर झोपला आहे. व्हायरल झालेला हा व्हिडिओ राजस्थानमधील जयपूरचा आहे, ज्यामध्ये हे सर्व लोक रस्ता सुरक्षेचे जवळपास सर्व नियम तोडताना दिसत आहेत.

धुलवड हा रंगांचा सण प्रत्येकजण आपापल्या शैलीत साजरा करतो. पण काही लोक असे असतात, जे या मस्तीत आपला जीव धोक्यात घालायलाही मागेपुढे पाहत नाहीत. आता व्हायरल झालेला हा व्हिडिओच पाहा. सुधारित मारुती झेन व्हिडिओमध्ये दिसते. ही गाडी ५ सीटर आहे, पण त्यात आठ लोक बसले आहेत. तर एक व्यक्ती बोनेटवर पडून आहे (Man Slept on Bonnet of Car) आणि बेधडकपणे मद्यपान करत आहे. हा व्हिडिओ जयपूरचा आहे. मात्र, अद्याप पोलिसांकडून कारवाई झाल्याचं वृत्त नाही. या लोकांनी रस्ता सुरक्षेचे अनेक नियम मोडले आहेत. एक म्हणजे मॉडिफाईड कारमध्ये चालवणं, दुसरी बाब धोकादायक पद्धतीने गाडी चालवणं आणि तिसरी म्हणजे दारू पिऊन गाडी चालवणं.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या साथीने त्रस्त असलेल्या लोकांना यावेळी होळी खेळण्याची संधी मिळाली, मात्र हे लोक रस्ता सुरक्षेचे सर्व नियम मोडताना दिसत आहेत. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ तिथून जाणाऱ्या एका व्यक्तीने शूट करून तो व्हायरल केला.

Web Title: drunk man on car bonnet video goes viral on internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.