Viral Video: नशेच्या धुंदीत रेल्वेखाली जाऊन झोपला दारुडा, भयानक घटना घडणार होती इतक्यात...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 05:19 PM2022-05-25T17:19:58+5:302022-05-25T17:23:16+5:30

अलीकडेच मध्य प्रदेशातील रेल्वे स्थानकावर असाच प्रकार घडला. यात एक व्यक्ती इतका मद्यधुंद झाला की तो स्टेशनवर उभ्या असलेल्या ट्रेनखालीच जाऊन झोपला. यानंतर लोकांना तिथे येऊन त्याला इथून बाजूला करावं लागलं.

drunk man slept under the railway engine rescued by people video goes viral on intenet | Viral Video: नशेच्या धुंदीत रेल्वेखाली जाऊन झोपला दारुडा, भयानक घटना घडणार होती इतक्यात...

Viral Video: नशेच्या धुंदीत रेल्वेखाली जाऊन झोपला दारुडा, भयानक घटना घडणार होती इतक्यात...

Next

दारूच्या नशेत असलेले लोक काहीही हास्यापद कृत्य करतात. लोक नशेत अनेकदा अशा चुका करतात की जेव्हा ते शुद्धीवर येतात तेव्हा त्यांनाच त्याची लाज वाटते. अलीकडेच मध्य प्रदेशातील ग्वालियर रेल्वे स्थानकावर असाच प्रकार घडला. यात एक व्यक्ती इतका मद्यधुंद झाला की तो स्टेशनवर उभ्या असलेल्या ट्रेनखालीच जाऊन झोपला. यानंतर लोकांना तिथे येऊन त्याला इथून बाजूला करावं लागलं.

शरद श्रीवास्तव यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये लोक एका व्यक्तीला ट्रेनच्या खालून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत (Man sleeping under train engine). पहिल्यांदा बघून तुम्हाला वाटेल की ती व्यक्ती आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असेल किंवा अपघातात ट्रेनखाली आली असेल, पण व्हिडिओचं कॅप्शन वाचल्यावर सत्य कळेल.

कॅप्शननुसार, हा व्यक्ती दारूच्या नशेत ट्रेनखाली जाऊन झोपला. याची माहिती मिळताच त्याला तिथून बाहेर काढण्यात आलं. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, "दोन पेग मारल्यावर, रेल्वे ट्रॅक आणि ट्रेनचं इंजिन सर्व मखमली दिसतं. दृश्य ग्वाल्हेरचं आहे. सुदैवाने या व्यक्तीचा जीव वाचला.” व्हिडिओमध्ये (Shocking Video Viral) एक व्यक्ती रुळावर, ट्रेनच्या इंजिनखाली झोपलेला दिसतो. अनेकजण एकत्र येत त्याला बाहेर काढताना दिसत आहेत. स्वतः उठून चालण्याइतपतही तो शुद्धीवर नाही. यानंतर सर्वजण मिळून त्याला इंजिनखालून बाहेर काढतात. व्हिडिओच्या शेवटी समजतं की हा ग्वाल्हेर स्टेशनवरील व्हिडिओ आहे.

 

Web Title: drunk man slept under the railway engine rescued by people video goes viral on intenet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.