Video : ३३ हजार फूट उंचीवर होतं विमान अन् नशेत व्यक्ती उघडू लागला दरवाजा....
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 01:30 PM2019-10-21T13:30:31+5:302019-10-21T13:36:12+5:30
असा विचार करा की, तुम्ही फ्लाइटने उंच आकाशात प्रवास करता आहात. अचानक तुम्हाला कळतं की, एका प्रवाशाला दारू चढली आणि तो उडत्या विमानाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होता.
असा विचार करा की, तुम्ही फ्लाइटने उंच आकाशात प्रवास करता आहात. अचानक तुम्हाला कळतं की, एका प्रवाशाला दारू चढली आणि तो उडत्या विमानाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होता. अशावेळी अर्थाच डोकं सुन्न होणं सहाजिक आहे. अशीच एक घटना समोर आली आहे. 'द सन' च्या एका रिपोर्टनुसार, ही घटना मास्को ते फुकेत जाणाऱ्या फ्लाइटमध्ये घडली असून याचा एका दुसऱ्या प्रवाशाने व्हिडीओही शूट केला.
ही एक नो-अल्कोहोल फ्लाइट होती. म्हणजे यात दारू पिण्यास मनाई होती. तरी सुद्धा तीन प्रवाशांनी दारू पिऊन चांगलाच गोंधळ घातला. इतका की, फ्लाइटचं इमरजन्सी लॅंडींग करवावं लागलं. सर्वातआधी नशेत असलेल्या एका व्यक्तीने ३३ हजार फूट उंचीवर फ्लाइटचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्याने भांडण केलं आणि तर तिसऱ्याला सिगारेटची इतकी तलब झाली की, तो फ्लाइटच्या टॉयलेटमध्ये जाऊन सिगारेट ओढू लागला.
याच फ्लाइटमध्ये टीव्ही रिपोर्टर Elena Demidova ही सुद्धा होती. तिने सांगितले की, फ्लाइटचे सुरूवातीची ३० मिनिटे नॉर्मल होती. पण त्यानंतर प्लेनमध्ये विचित्र गोष्टी घडू लागल्या. अचानक सीट बेल्ट लावण्याची चिन्हे ब्लिंक होऊ लागलीत. काही वेळाने पायलटने प्रवाशांसोबत संवाद साधला आणि सांगितले की, फ्लाइटच्या मागच्या भागात एक व्यक्ती नशेत आहे आणि तो गोंधळ घालत आहे.
फ्लाइटमधील त्या नशेतील व्यक्तीला शांत करण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा काहीच फायदा झाला नाही तेव्हा त्याला प्लास्टिक फूड रॅपने बांधण्याचा प्रयत्न करण्यात आला. एका अधिकाऱ्याने सांगितले की, सात-सात लोक त्या नशेतील व्यक्तीला पकडत होती, पण तरी तो कंट्रोलमध्ये येत नव्हता.
जेव्हा लोक त्याला कंट्रोल करण्यात अपयशी ठरले तेव्हा पायलटला फ्लाइटचं इमरजन्सी लॅंडिंग उझबेकिस्तानमध्ये करावं लागलं. तिथे त्या नशेतील व्यक्तींना अटक करण्यात आली.