VIDEO : बदकाची शिकार करण्यासाठी पाण्यात शिरला वाघ, बघा मग काय झालं...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 02:00 PM2021-09-27T14:00:52+5:302021-09-27T14:02:58+5:30

एक वाघ असाच विचार करून पाण्यात शिरला. पण आत गेल्यावर एका बदकाने वाघाची अशी काही शाळा घेतली की, तो कधीही विसरणार नाही. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Duck tiger video tiger attack on duck then what happened watch viral video | VIDEO : बदकाची शिकार करण्यासाठी पाण्यात शिरला वाघ, बघा मग काय झालं...

VIDEO : बदकाची शिकार करण्यासाठी पाण्यात शिरला वाघ, बघा मग काय झालं...

googlenewsNext

हे तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, जंगल आणि पाण्याचं विश्व फारच वेगळं आहे. इथे मनुष्यांचं नाही तर प्राण्यांचं राज्य चालतं. सगळ्यांचा आपापला भाग ठरलेला असतो. तरी सुद्धा काही प्राणी असे असतात जे स्वत:ला फार शक्तीशाली समजतात. ते शिकार करण्यासाठी कुठेही जातात. काही वेळा त्यांना यश मिळतं, तर अनेकदा त्यांच्या हाती काहीच लागत नाही. एक वाघ असाच विचार करून पाण्यात शिरला. पण आत गेल्यावर एका बदकाने वाघाची अशी काही शाळा घेतली की, तो कधीही विसरणार नाही. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत एक वाघ बदकाची शिकार करण्यासाठी पाण्यात गेला होता. पण वाघाला काय माहीत की, बदक त्यालाच पाणी पाजेल. व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, बदकाला पाहून वाघ पाण्यात शिरतो. अर्ध शरीर पाण्यात बुडवून वाघ हळूहळू पुढे सरकतो आहे. अशात वाघ जसा बदकाकडे जातो बदक अचानक गायब होतं. काही वेळाने बदक दुसऱ्याचा ठिकाणी पोहोचलेलं दिसतं. वाघ जेव्हा पुन्हा त्याच्याकडे जातो तेव्हा बदक पुन्हा त्याला चकमा देतो. 

बदकाने वाघाला ज्याप्रमाणे पाणी पाजलं ते पाहून लोक फारच खूश झाले आहेत. ट्विटरवर हा व्हिडीओ '@buitengebieden' नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आता व्हायरल झााल आहे. या व्हिडीओला आतापर्यंत १ लाख १५ हजार व्ह्यूज मिळाले आहेत. साधारण १० हजार लोकांनी व्हिडीओला लाइक केलंय. तर लोकांनी या व्हिडीओवर अनेक मजेदार कमेंट्सही केल्या आहेत. 
 

Web Title: Duck tiger video tiger attack on duck then what happened watch viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.