छाव्यांसह फिरणारी वाघिण कॅमेरात कैद; डोळ्यांवर प्रकाश येताच केलं असं काही; पाहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2020 03:44 PM2020-11-10T15:44:49+5:302020-11-10T16:19:53+5:30
Viral News in Marathi : कोणताही आवाज न करता कॅमेरात हे दृश्य टिपण्याचा अनुभव मस्त होता.
दुधवा टायगर रिजर्व क्षेत्रात एक वाघिण तिच्या छाव्यांसह संचार करत होती. वाघिणीचा संचार कॅमेरात कैद झाला आहे. आयएफएस अधिकारी रमेश पांडे यांना व्हिडीओ शेअर केला असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता वाघिण कारपासून दूर पळण्याचा प्रयत्न करत आहे. तिच्या आजूबाजूला छावे सुद्धा फिरत आहेत. फिल्ड डायरेक्टरला शूट करताना पाहून वाघिण आपल्या छाव्यांच्या जवळ गेली अन् काहीवेळ तिथेच थांबून जंगलात जाण्यास निघाली.
Brilliant and beautiful capture of tigress with cubs in Dudhwa Tiger Reserve by Field Director. A worth watch. @ntca_india@UpforestUppic.twitter.com/1maLjD13K7
— Ramesh Pandey IFS (@rameshpandeyifs) November 9, 2020
आतापर्यंत १९ हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. रमेश पांडे यांनी हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शन दिले की, हे दृश्य पाहण्यासारखे होते. हे जंगलात फिरण्याचे माझे बक्षिस आहे. कोणताही आवाज न करता कॅमेरात हे दृश्य टिपण्याचा अनुभव मस्त होता. इतर ट्विटर युजर्सनीसुद्धा या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ हजारो लाोकांनी पाहिला आहे.
'बाबा का ढाबा' चालवणाऱ्या बाबांनी फसवणूकीचा आरोप केल्यानंतर यु-ट्यूबरनं दिलं उत्तर; म्हणाला....
भारतातील दुर्मिळ काळ्या रंगाचा वाघ कॅमेरात कैद
फोटोग्राफर सौमेन बायपेयी मागच्या वर्षी नंदनकावन अभयारण्यात गेले होते. तेव्हा त्यांना मेलानिस्टिक वाघ (Melanistic Tiger) दिसला. वाघांची ही प्रजात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. मेलानिस्टिक ही वाघाची दुर्मिळ प्रजात आहे. या प्रजातीचे वाघ ओडिसामध्ये दिसून येतात. दिवसेंदिवस या वाघांची संख्या कमी होत आहे. थोड्याफार प्रमाणात वाघ अस्तित्वात आहेत.
मुळचे पश्चिम बंगालच्या पंसकुरा येथिल रहिवासी असलेले सौमेन बायपेयी मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये नंदनकावनमध्ये पक्षी निरिक्षण करत होते. सुरूवातीला त्यांना वाघाला पाहिल्याचे जाणवले. एनडीटीव्हीशी बोलताना सौमेन यांनी सांगितले की, '' मी झाडाझुडूपांमध्ये पक्षी आणि माकडांचे निरिक्षण करत होतो. तेव्हा अचानक समोर वाघासारखे काहीतरी दिसले. पण तो सामान्य वाघ नव्हता. त्यावेळी मला मेलेनिस्टीक या वाघांच्या प्रजातींबद्दल काहीही कल्पना नव्हती. काही सेंकद थांबून वाघ पुन्हा जंगलाच्या दिशेने गेला. आतापर्यत मी अनेक वाघ पाहिले पण असा वाघ पाहिला नव्हता. ''
Video : पाकमध्ये पहिल्यांदाच सुरू झाली मेट्रो; पब्लिकची प्रवासाची स्टाईल पाहून पोट धरून हसाल
या दरम्यान वाईल्ड लाईफ फोटोग्राफर सौमेन यांनी आपल्या कॅमेरात वाघाचे फोटो कैद केले होते. वाघांबद्दल सांगताना सौमेन म्हणाले होते की, १९९३ मध्ये त्यानंतर २००७ मध्ये ओडिशाच्या सिमलीपाल टायगर रिझर्व्हमध्ये मेलिस्टिक वाघांची उपस्थिती नोंदवली गेली. त्यानंतर, काही वर्षांनंतर, नंदकन अभयारण्यात एका वाघाने चार छाव्यांना जन्म दिला. त्यातील दोन मेलेनिस्टीक होते. ते दोन मेलेनिस्टीक वाघ त्वरित लक्षात आले आणि त्यांच्या वाढीची सीसीटीव्हीद्वारे देखरेख केली गेली. एक वर्षानंतर, त्याला मोकळ्या वातावरणात आणले गेले. क्या बोनस है रे बाबा! बोनसची वाट पाहण्याच्या नादात नेटकऱ्यांनी पाडला भन्नाट मीम्सचा पाऊस; पाहा फोटो