एका हेलिकॉप्टरमुळे म्हशीचा जागीच मृत्यु... तक्रारीचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 02:28 PM2022-11-14T14:28:33+5:302022-11-14T14:33:09+5:30

सोशल मीडियावर म्हैस मेल्याची एक तक्रार व्हायरल होत आहे. ही म्हैस कोणत्या दुर्घटनेत नाही तर हेलिकॉप्टरच्या कर्कश्य आवाजाने मेली आहे.

due-to-sound-of-helicopter-buffalo-dies-on-the-spot-complaint-letter-went-viral-on-social-media | एका हेलिकॉप्टरमुळे म्हशीचा जागीच मृत्यु... तक्रारीचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल

एका हेलिकॉप्टरमुळे म्हशीचा जागीच मृत्यु... तक्रारीचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल

googlenewsNext

सोशल मीडियावर म्हैस मेल्याची एक तक्रार व्हायरल होत आहे. ही म्हैस कोणत्या दुर्घटनेत नाही तर हेलिकॉप्टरच्या कर्कश्य आवाजामुळे मेली आहे. राजस्थानच्या बहरोरमधील कोहराना गावात एका म्हशीचा चक्क हेलिकॉप्टरच्या आवाजामुळे जीव गेला. गावातील एका घरावरुन हेलिकॉप्टर जात असताना झालेल्या कर्णकर्कश्य आवाजामुळे म्हशीचा मृत्यु झाला. म्हशीचा मालक बलवीर सिंह ने हेलिकॉप्टरच्या पायलटविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. 

बलवीर सिंह यांचे हे तक्रार पत्र १३ नोव्हेंबर ला ट्विटरवर व्हायरल झाले. बलवीर यांना याची भरपाई मिळालीच पाहिजे असा कमेंट करत नेटकरी पुढे सरसावले. त्या दिवशी दुपारी अडीच वाजता बहरोरचे आमदार बलजीत यादव यांच्या सांगण्याने हेलिकॉप्टरमधून कोहराना गावावर पुष्पवृष्टी केली गेली. तेव्हा बलजीत सिंह यांच्या घरावरुन केवळ २० मीटर उंचीवरुवन हेलिकॉप्टर गेले. हेलिकॉप्टरच्या जोरदार आवाजामुळे म्हैसही घाबरली आणि जमिनीवर पडली.  यामध्ये म्हशीचा मृत्यु झाला. 

Image

बलजीत सिंह यांनी सांगितले, 'मी एक गरीब शेतकरी आहे. म्हैस हीच माझ्या उदरनिर्वाहाचे साधन होती. पायलटच्या बेजबाबदारपणामुळे म्हशीचा मृत्यु झाला. यावर कायदेशीर कारवाई करुन भरपाई द्यावी अशी माझी मागणी आहे.'

आमदार बलजीत यादव यांनी गेल्या ४ वर्षात केलेल्या कामांनंतर कार्यकर्त्यांचे आभार मानण्यासाठी ही पुष्पवृष्टी केली होती. प्रत्येक गावात हे हेलिकॉप्टर फिरले. प्रशासनाने म्हशीची मेडिकल तपासणी केली. त्यातुन मृत्युचे खरे कारण समजले. 

Web Title: due-to-sound-of-helicopter-buffalo-dies-on-the-spot-complaint-letter-went-viral-on-social-media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.