Viral Video: पक्ष्याने केली कोल्ह्याची शिकार, थरकाप उडवणारी घटना कॅमऱ्यात कैद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 01:17 PM2022-02-25T13:17:53+5:302022-02-25T13:22:35+5:30
गरूडाची नजर, झेप आणि वेग तुम्हाला माहितीच आहे. या गरूडाने आकाशातून जमिनीवर झेप घेत कोल्ह्यावर हल्ला केला आहे. हा संपूर्ण थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. व्हिडीओ पाहूनही तुम्हाला विश्वास बसणार नाही.
प्राण्याने प्राण्यांची शिकार केल्याचे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. प्राण्यांप्रमाणे काही पक्षीही असे आहेत, जे आकाशात उडता उडता आकाशातून जमिनीकडे झेप घेत शिकार करतात. अशीच शिकार करणाऱ्या एका पक्ष्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्याने एका कोल्ह्याची शिकार केली आहे (Bird attack on animal video).
इतर हिंस्र प्राण्यांना तुम्ही कोल्ह्याची शिकार करताना पाहिलं असेल. पण कधी कोणत्या पक्ष्याला कोल्ह्याची शिकार करताना पाहिलं आहे का? आता कोल्ह्यासारख्या प्राण्याची शिकार कोणता पक्षी बरं करेल, असा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल. तर कोल्ह्याची शिकार करणारा हा पक्षी आहे, गरूड (Eagle attack on fox video).
गरूडाची नजर, झेप आणि वेग तुम्हाला माहितीच आहे. या गरूडाने आकाशातून जमिनीवर झेप घेत कोल्ह्यावर हल्ला केला आहे. हा संपूर्ण थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. व्हिडीओ पाहूनही तुम्हाला विश्वास बसणार नाही.
— Life and nature (@afaf66551) February 13, 2022
व्हिडीओत पाहू शकाल सुरुवातीला आकाशात एक गरूड उडताना दिसतो. त्यावेळी त्याची नजर जमिनीवरील एका कोल्ह्यावर पडते. कोल्ह्याला काही समजायच्या आत गरूड त्याच्या दिशेने झेपावत त्याच्यावर हल्ला करतो. त्याला आपल्या पायात धरण्याचा प्रयत्न करतो. पण कोल्हा धडपड करून त्याच्या तावडीतून सुटतो. त्यानंतर तो आपला जीव वाचवण्यासाठी तिथून पळतो. यावेळी गरूड दिसत नाही.
गरूडाने त्याचा पाठलाग सोडला असं वाटतं. पण कोल्हा काही अंतरापर्यंत धावत गेल्यानंतर गरूड त्याच्यावर पुन्हा हल्ला करतो. गरूड कोल्ह्याला पुन्हा धरून जमिनीवर आपटतो. यावेळी मात्र कोल्हा त्याच्या तावडीत सापडतोच. लाइफ अँड नेचर नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून लोक हैराण झाले आहेत.