VIDEO: बागेत खेळणाऱ्या चिमुरड्याला गरुडानं उचललं; वडिलांचा थरकाप उडाला; अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 04:57 PM2022-03-18T16:57:11+5:302022-03-18T17:00:42+5:30

थरकाप उडवणारी घटना कॅमेऱ्यात कैद; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

eagle started flying with the child playing in the park seeing this parents were blown away | VIDEO: बागेत खेळणाऱ्या चिमुरड्याला गरुडानं उचललं; वडिलांचा थरकाप उडाला; अन् मग...

VIDEO: बागेत खेळणाऱ्या चिमुरड्याला गरुडानं उचललं; वडिलांचा थरकाप उडाला; अन् मग...

Next

गरुडाची नजर अतिशय तीक्ष्य असते. ५०० फूट अंतरावरूनही गरुड आपलं भक्ष्य पाहू शकतो. गरुडाच्या पंखांमध्ये ताकद असते. जवळपास ६ किलो वजन उचलून गरुड भरारी घेऊ शकतो. लहान जनावरं आणि मासे यांची शिकार करून अनेकदा गरुड भरारी घेताना दिसतो. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेला थरकाप उडवणारा आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये गरुड एका लहान मुलाला पकडून उडताना दिसत आहे. गरुड मुलाला घेऊन उडत असल्याचं पाहून तिथे असलेल्या वडिलांच्या काळजाचा ठोका चुकला. वडिलांनी गरुडाच्या दिशेनं धावण्यास सुरुवात केली. वडील काही फूट दूर असताना गरुडाची परड थोडी सैल झाली आणि चिमुरडा खाली कोसळला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

एक लहान मुलगा बागेत वडिलांसोबत खेळण्यासाठी आला होता. वडिलांचं मुलाकडे लक्ष नसताना आकाशातून अचानक एक गरुड खाली आला. त्यानं आपल्या पंजांमध्ये मुलाला धरलं. त्यानंतर त्यानं उड्डाण घेतलं. गरुड भरारी घेत असताना वडिलांचं लक्ष मुलाकडे गेलं. त्यांनी लगेच गरुडाच्या दिशेनं धाव घेतली. चिमुरड्याला घेऊन भरारी घेत असलेल्या गरुडाची पकड अचानक सैल झाली. त्यामुळे चिमुकला काही फूट उंचीवरून जमिनीवर कोसळला. हा व्हिडीओ पाहून अनेकांचा थरकाप उडाला आहे. 

Web Title: eagle started flying with the child playing in the park seeing this parents were blown away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.