टाईल्सवरील सिलिंडरचे चिव्वट पिवळे डाग लगेच होईल दूर, करा हे सोपे-स्वस्त घरगुती उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 12:39 PM2024-11-11T12:39:26+5:302024-11-11T12:47:20+5:30
Cleaning cylinder marks from the floor : फार जास्त काही खर्च न करता सोप्या घरगुती उपायांनी देखील तुम्ही हे डाग काढून टाइल्स क्लीन करू शकता. असाच एक उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Cleaning cylinder marks from the floor : सामान्यपणे घरात ज्या ठिकाणी गॅस सिलिंडर ठेवलं जातं, तिथे पिवळे-काळे डाग लागतात. सिलिंडर बाजूला केलं की, टाइल्सवर गंजल्याचे डाग लागलेले दिसतात. हे डाग रोज पुसल्यानंतरही दूर होत नाहीत. याने टाइल्स तर खराब दिसतेच, सोबतच त्यावर बॅक्टेरियाही जमा होतात. तसे तर बाजारात असे चिव्वट डाग दूर करणारी उत्पादने मिळतात. मात्र, फार जास्त काही खर्च न करता सोप्या घरगुती उपायांनी देखील तुम्ही हे डाग काढून टाइल्स क्लीन करू शकता. असाच एक उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
साहित्य
२ चमचे बेकिंग सोडा
१ चमचा लिंबाचा रस
१ चमचा व्हाईट व्हिनेगर
अर्धा कप गरम पाणी
- सगळ्यात आधी एका वाटीमध्ये २ चमचे बेकिंग सोडा टाका. आता त्यात एक चमचा लिंबाचा रस टाका आणि एक चमचा व्हाईट व्हिनेगर टाका. या मिश्रणाला हलका फेस येईल. आता यात गरम पाणी टाकून चांगलं मिक्स करा.
- आता हे मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये ठेवा आणि चांगल्याप्रकारे मिक्स करा. जिथे डाग लागले आहेत तिथे ते स्प्रे करा आणि १० ते १५ मिनिटे तसंच राहू द्या. नंतर स्क्रबर किंवा एखाद्या जुन्या ब्रशने डाग घासून काढा.
- काही वेळात तुम्हाला टाईल्सवरील पिवळे चिव्वट डाग दूर झालेले दिसली. नंतर साध्या पाण्याने ती जागा धुवून कोरड्या कापडाने पुसून घ्या.