काय सांगता? भिकारी महिलेच्या अकाऊंटमध्ये सापडले तब्बल दीड कोटी रुपये, अन् मग.....

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2020 04:45 PM2020-11-01T16:45:10+5:302020-11-01T16:50:47+5:30

एका भिकारी महिलेच्या बँकेच्या खात्यात एक कोटी ४२ लाख सापडल्याची घटना घडली आहे. या भिकारी असलेल्या महिलेच्या नावावर तब्बल पाच घरं आहे.

Egypt woman beggar owns five buildings lakhs of rupees | काय सांगता? भिकारी महिलेच्या अकाऊंटमध्ये सापडले तब्बल दीड कोटी रुपये, अन् मग.....

काय सांगता? भिकारी महिलेच्या अकाऊंटमध्ये सापडले तब्बल दीड कोटी रुपये, अन् मग.....

Next

रस्त्यावरच्या भिकाऱ्यांची अवस्था पाहून अनेकदा त्यांच्या केविलवाण्या चेहऱ्याकडे पाहून खूप दया येते. म्हणून जास्तीजास्त लोक भिकाऱ्यांना  जमेल तेवढे पैसे देतात. पण कधी कधी याच भिकाऱ्यांची संपत्ती इतकी असते की, तुम्ही त्याचा अंदाजही लावू शकत नाही. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 
एका भिकाऱ्याच्या बँकेच्या खात्यात एक कोटी ४२  लाख सापडल्याची घटना घडली आहे. या भिकारी असलेल्या महिलेच्या नावावर तब्बल पाच घरं आहे. या महिलेचं वय ५७ वर्ष आहे. ही भानगड नक्की काय आहे. याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

gulfnews.com च्या एका रिपोर्टनुसार बँकेत दीड कोटी रुपये ठेवणारी ही महिला इजिप्तची रहिवासी आहे. या महिलेला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. स्थानिक माध्यम Al Masry Al Youm च्या एका रिपोर्टनुसार ही महिला व्हिलचेअरवर बसून भीक मागत होती. स्वतःचा पाय कापला गेला आहे. असं दाखवत संपूर्ण इजिप्तच्या अनेक राज्यांमध्ये फिरून भीक मागत होती. 

Wheel chair

भीक मागताना ही महिला व्हिलचेअरवर असायची. इतरवेळी आपल्या दोन्ही पायांच्या आधारे ही महिला चालायची. जेव्हा एका व्यक्तीने या महिलेला पायांनी चालताना पाहिले तेव्हा या गंभीर प्रकरणाहबाबत खुलासा झाला. या महिलेचे नाव नफीसा असून  पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे. चौकशीदरम्यान दिसून आलं की, या महिलेला कोणताही आजार नाही. तसंच दोन बँक अकाऊंट्समध्ये या महिलेची १ कोटी  ४२ लाख रुपये इतकी रक्कम आहे. 

 Fack check : या भिकाऱ्यांना मिळतो वीक-ऑफ; दिवसानुसार बदलतात देवाचा फोटो

अनेकदा भिकारी एखाद्या देवाचा फोटो वापरुन भीक मागत असल्याचं दिसतं. जम्मू-काश्मीरात भिकारी बनलेले दोन लहान मुलं कधी वैष्णवी देवीचा तर कधी भगवान शंकराचा फोटो एका थाळीत सजवून भीक मागण्यासाठी जातात.

प्रत्येक भिकाऱ्याचा स्वत:चा परिसर ठरलेला असतो. कधीकधी शहरातील गर्दीच्या ठिकाणी लहान मुलं भीक मागताना शॉपिंग मॉल्स, सिनेमा हॉलबाहेर गर्दीतील लोकांचा पाठलाग सोडत नाही, लोकांचे कपडे ओढून भीक मागितली जाते.

लहान मुलांच्या अशा वागण्याने लोकांना त्रास सहन करावा लागतो. इतकचं नाही तर हे भिकारी रविवारी वीक-ऑफही घेतात. जम्मू काश्मिरात भीक मागण्यावर बंदी नाही. शहरातील भिकाऱ्यांची संख्या प्रतिदिन वाढत चालली आहे. कधी कधी चौकाचौकात उभं असणाऱ्या भिकाऱ्यांच्या पाठलाग करण्याने अनेक अपघातही घडले आहेत. अमर उजाला या हिंदी दैनिकाने केलेल्या सर्व्हेनुसार भिकाऱ्यांचे एक संघटन असते. सर्व भिकाऱ्यांना आपापला परिसर वाटून दिलेला असतो. त्यामुळे ठरवून दिलेल्या जागेतच यांना भीक मागावी लागते.

भिकारी शुक्रवारी वैष्णवी देवीचा तर सोमवारी शंकराचा फोटो लावून भीक मागतात. मंगळवारी हनुमान, गुरुवारी साईबाबाच्या नावावर भीक मागतात.भीक मागणाऱ्या मुलांना रोखण्यासाठी इंटिग्रेटेड चाइल्ड प्रोटेक्शन स्कीम सुरु आहे. यामध्ये लहान मुलांचे समुपदेशन केले जाते. चाइल्ड हेल्पलाइन १०९८ आणि स्थानिक पोलिसांची मदत घेतली जाते अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. Video : ४ वर्षांच्या चिमुरडीने गायलं वंदे मातरम; PM मोदींनीही घेतली दखल, म्हणाले......

जम्मू काश्मीर हायकोर्टाने ऑक्टोबर २०१९ मध्ये भीक मागण्याबाबत प्रिवेंशन ऑफ बेगरी एक्ट १९६० आणि १०६४ असैविधानिक असल्याचं सांगितले. आयुष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी संघर्षामुळे गरिबांना भीक मागावी लागते. गरिबांना सोयी-सुविधा न देऊ शकणे हे सरकारचं अपयश आहे. बापरे! नदीत पोहोताना दिसला तब्बल ५० फुटांचा अ‍ॅनाकोंडा; वाचा व्हायरल व्हिडीओ मागचं सत्य

Web Title: Egypt woman beggar owns five buildings lakhs of rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.