Video - ही दोस्ती तुटायची नाय! ICU मध्ये आठवण; 60 वर्षांनी 86 वर्षीय महिलेची मैत्रिणीशी भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 06:18 PM2024-01-18T18:18:28+5:302024-01-18T18:25:09+5:30
गेल्या 60 वर्षांपासून ही महिला आपल्या मैत्रिणीला भेटली नव्हती. लग्नानंतर मैत्रीण लंडनला गेला होती. त्यामुळे त्यांची भेट झाली नाही.
मैत्रीचं नातं हे नेहमीच खूप जास्त स्पेशल असतं. हे नाते काहींसाठी काही वर्षे टिकू शकतं तर काही लोकांसाठी ते आयुष्यभर टिकू शकतं. खरा मित्र कुठेही गेला तरी माणूस त्याला कधीच विसरत नाही. असाच काहीसा हृदयस्पर्शी प्रकार एका वृद्ध महिलेसोबत देखील घडला. तिचं वय 86 वर्षे आहे. ICU मध्ये दाखल झाल्यावर तिला तिच्या मैत्रिणीची आठवण झाली आणि तिने तिच्या मैत्रिणीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली.
गेल्या 60 वर्षांपासून ही महिला आपल्या मैत्रिणीला भेटली नव्हती. लग्नानंतर मैत्रीण लंडनला गेला होती. त्यामुळे त्यांची भेट झाली नाही. आता त्यांचा नातू अनिश भगतने ही गोष्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. अनिश सांगतो की, त्याची आजी आयसीयूमध्ये दाखल होती. जिथे तिने आपल्या मैत्रिणीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. अनेक वर्षांपासून आम्ही तिची मैत्रिण अंजली कवडीकर हिचा शोध घेत होतो.
लग्नानंतर मैत्रीण लंडनला गेली. पण शेवटी आम्हाला ती सापडली. अनिश सांगतो की, त्याचे वडील त्याच्या आजीच्या मैत्रिणीच्या मुलाला लिंक्डइनवर भेटले. आम्ही त्यांच्याशी बोललो तेव्हा कळलं की त्यांची आई उपचारासाठी पुण्याला आली आहे. अनिश पुढे म्हणाला की, "आजीच्या 86 व्या वाढदिवसाला फक्त एक आठवडा उरला होता. आम्ही तिला कुठे नेत आहोत हे तिला कळत नव्हतं. पण ती सतत विचारत होती."
"आम्ही तिला तिच्या मैत्रिणीच्या घरी घेऊन गेलो. 60 वर्षांनंतर झालेल्या या भेटीनंतर दोघीही भावूक झाल्या, दोघीही एकमेकांना पाहू लागल्या. तू म्हातारी दिसतेस असं एकमेकींना म्हणू लागल्या. दोघांनीही पूर्ण वेळ एकमेकांचे हात धरले. चांगली मैत्रीण मिळणं एखाद्या आशीर्वादापेक्षा कमी नाही. दोघींनी एकत्र जेवण केलं. मग केक कापला. आजी तिच्या मैत्रिणीकडे आठवडाभर राहिली."