तुर्कीत विजेचा हाहाकार; 50 मिनिटात 100 वेळा पडली वीज, पाहा थरारक व्हिडिओ...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 03:12 PM2023-06-21T15:12:48+5:302023-06-21T15:13:38+5:30
या भरारक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
तुम्ही अनेकदा वीज पडल्याचे दृष्य पाहिले असेल. पासाळ्यात अनेकवेळा वीज पडते. पण, तुम्ही कधी काही मिनिटात 100 वेळा वीज पडल्याचे पाहिले आहे का? अशीच घटना 16 जून 2023 रोजी तुर्कीच्या किनारपट्टीवरील मुदान्या शहरात घडली आहे. सलग 50 मिनिटात 100 वेळा वीज पडली. म्हणजेच दर 30 सेकंदाला एकदा वीज पडली.
असे आश्चर्यकारक दृश्य क्वचितच पाहायला मिळते. खगोल छायाचित्रकार उगार इकिजलर यांनी हे विलोभनीय दृश्य कॅमेऱ्यात टिपले. त्यांनी या 50 मिनिटाच्या घटनेचा टाईम लॅप्स बनवला आणि नंतर त्याचा एक फोटोही शेअर केला. उगार यांनी घराच्या छतावर लावलेल्या कॅमेऱ्यातून हे दृष्य टिपले आहे. अशाप्रकारची घटना यापूर्वी कधीच पाहिली नसल्याचे उगार म्हणाले.
या घटनेचा अप्रतिम व्हिडिओ पाहा-
पृथ्वीवर दरवर्षी सुमारे 140 कोटी वेळा वीज पडते. म्हणजे दररोज सुमारे 30 लाख वेळा. प्रत्येक पडणाऱ्या विजेच्या आत 100 मिलियन ते 1000 मिलियन व्होल्टेज असते. एवढ्या व्होल्टेजमुळे आजूबाजूच्या हवेचे तापमान 10 हजार अंश सेल्सिअस ते 22 हजार अंश सेल्सिअसपर्यंत वाढू शकते.