VIDEO : नदीत बुडत असलेल्या व्यक्तीला वाचवण्यासाठी धावत आला हत्ती आणि मग....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2022 10:57 AM2022-07-08T10:57:40+5:302022-07-08T10:58:35+5:30
Elephant Saves Man Life From Drowning: असं क्वचितच बघायला मिळतं की, एखाद्या व्यक्तीचा जीव धोक्यात आहे आणि त्याचा जीव वाचवण्यासाठी एखादा प्राणी धावत आला. असं श्वानाबाबत बघायला मिळतं. मात्र, अशीच एक घटना समोर आली आहे.
Elephant Saves Man Life From Drowning: जेव्हाही एखाद्या व्यक्तीचा जीव धोक्यात असतो तेव्हा काही लोक मदतीसाठी धावत येतात. इतकंच नाही तर जेव्हा एखादा प्राणी रहिवाशी भागात अकडतो तेव्हा त्याच्या मदतीसाठी लोक समोर येतात. अशा घटनांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असं क्वचितच बघायला मिळतं की, एखाद्या व्यक्तीचा जीव धोक्यात आहे आणि त्याचा जीव वाचवण्यासाठी एखादा प्राणी धावत आला. असं श्वानाबाबत बघायला मिळतं. मात्र, अशीच एक घटना समोर आली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या जुन्या व्हिडीओत हेच बघायला मिळतं. व्हिडीओत दिसणारं हत्तीचं पिल्लू संवेदनशील आहे. व्हिडीओत बघू शकता की, एका व्यक्ती नदीच्या पाण्यात बुडताना दिसत आहे आणि तो नदीच्या प्रवाहात वाहून जात आहे. दरम्यान हत्तींचा एक कळप नदी पार करण्याच्या प्रयत्नात तिथेच आहे. याच कळपातील एका हत्तीच्या पिल्लाला नदीत वाहून जाणारी व्यक्ती दिसते आणि त्याचा जीव वाचण्यासाठी हे हत्तीचं पिल्लू वाहती नदी क्रॉस करून येतं. व्यक्तीला ते सोंडेने बाहेर काढतं आणि ओढत किनाऱ्यावर नेतं.
This young elephant spots a man he thinks is drowning in the river, and rushes across to save him, so tenderly. We are so lucky to share the world with such creatures. They are so unlucky to share it with us. pic.twitter.com/BIyQSqJ5HU
— Ben Goldsmith (@BenGoldsmith) September 15, 2019
हत्तीने आधी त्याला आपल्या सोंडेत पकडण्याचा प्रयत्न केला, नंतर व्यक्तीनेच हत्तीची सोंड पकडली. व्यक्तीला सोंडेत पकडता येत नसल्याचं लक्षात येताच हत्ती त्याला पायाने बाहेर ढकलतो. हा व्हिडीओ @BenGoldsmith नावाच्या ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 73 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. इतकंच नाही तर व्हिडीओला 9 हजार लाईक्स आणि अडीच हजारांपेक्षा जास्त रिट्विट मिळाले आहेत.