Viral Video: हत्तीचं पिल्लू आईला शोधत सैरावैरा पळतं होतं, वनअधिकाऱ्यांनी घडवून दिली आई-लेकराची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 04:43 PM2021-10-08T16:43:26+5:302021-10-08T16:43:35+5:30

एका हत्तीचे पिल्लू त्याच्या आईपासून विभक्त झाले. मात्र त्या पिल्लाची वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अथक परिश्रमाने त्याच्या आईशी भेट घडवून दिली.

elephant baby searching for his mother reunited by forest officers video goes viral | Viral Video: हत्तीचं पिल्लू आईला शोधत सैरावैरा पळतं होतं, वनअधिकाऱ्यांनी घडवून दिली आई-लेकराची भेट

Viral Video: हत्तीचं पिल्लू आईला शोधत सैरावैरा पळतं होतं, वनअधिकाऱ्यांनी घडवून दिली आई-लेकराची भेट

googlenewsNext

कोणतेही मूल किंवा आई एकमेकांशिवाय जगू शकत नाही. असे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप दिसतात. आता अलीकडेच आणखी एक किस्सा समोर आला आहे. ज्यात मनुष्य नाही तर एका हत्तीचे पिल्लू त्याच्या आईपासून विभक्त झाले. मात्र त्या पिल्लाची वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अथक परिश्रमाने त्याच्या आईशी भेट घडवून दिली.

व्हिडिओमध्ये वन विभागाचे अनेक अधिकारी जंगलात दिसत आहेत. एक हत्तीचे पिल्लू त्यांच्यासोबत चालत आहे. व्हिडिओमध्ये ते सर्व अधिकारी हत्तीच्या बाळाला मदत करत आहेत. हा व्हिडिओ आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, ‘मुदुमलाईमध्ये तामिळनाडू फॉरेस्टर्सने बचाव केल्यानंतर एका हत्तीच्या पिल्लुची त्याच्या कुटुंबाशी पुन्हा भेट करवून दिली. खरंच, हे हृदयस्पर्शी आहे. खूप कौतुक.'


लोक या व्हिडिओवर बऱ्याच प्रतिक्रिया देत आहेत. एकाने कमेंट केली की, ‘खूप गोंडस बाळ आहे. वन अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे वन्य प्राणी जिवंत आहेत, अन्यथा शिकारी त्यांना कधीच मारतील. दुसऱ्याने लिहिले, ‘हा खरोखर एक उत्तम व्हिडिओ आहे.’ 

Web Title: elephant baby searching for his mother reunited by forest officers video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.