Viral Video: शांतता अन् संयमाने प्रेमाला जिंकता येतं, हत्तींच्या कळपाने सिद्ध केले हे वाक्य, पाहा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 05:37 PM2022-03-18T17:37:00+5:302022-03-18T17:40:45+5:30

हत्ती हा एक शाकाहारी वन्यजीव आहे. तो रागीटही आहे, तसेच प्रेमळ प्राणीही आहे. असे म्हणतात, की प्रेम करणाऱ्यांना कोणत्याच सीमा कधीच वेगळ्या करू शकत नाहीत. हा एक विचार आहे. याच्याशीच संबंधित एक व्हिडिओ समोर आला आहे.

elephant crosses wooden fence to meet friend elephants video goes viral on internet | Viral Video: शांतता अन् संयमाने प्रेमाला जिंकता येतं, हत्तींच्या कळपाने सिद्ध केले हे वाक्य, पाहा व्हिडिओ

Viral Video: शांतता अन् संयमाने प्रेमाला जिंकता येतं, हत्तींच्या कळपाने सिद्ध केले हे वाक्य, पाहा व्हिडिओ

Next

वन्य प्राण्यांचे व्हिडिओ हे एक वेगळे आणि अद्भुत जग आहे. वन्यजीवांची जीवनशैली पाहून मनाला शांती मिळते. जंगलात (Jungle) अनेक प्राणी असले तरी हत्तीचा (Elephant) एक वेगळाच स्वॅग (Swag) असतो. हा असा प्राणी आहे, जो मानवाचा चांगला मित्र मानला जातो. यामुळेच विविध संस्कृती आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये याला स्थान मिळते. हत्ती हा एक शाकाहारी वन्यजीव आहे. तो रागीटही आहे, तसेच प्रेमळ प्राणीही आहे. असे म्हणतात, की प्रेम करणाऱ्यांना कोणत्याच सीमा कधीच वेगळ्या करू शकत नाहीत. हा एक विचार आहे. याच्याशीच संबंधित एक व्हिडिओ समोर आला आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की हत्तींच्या कळपापासून विभक्त झालेल्या लाकडी वर्तुळात एक हत्ती कैद झाला आहे. जिथे समोरच हत्तींचा कळप होता आणि तो समोरच्या लाकडाच्या आवारात होता. हे सगळे सुरू असताना गजराजाचा आपल्या प्रियजनांना भेटण्याची अशी काही आस निर्माण झाली, की त्याने आजूबाजूला काहीही बघितले नाही. त्या लाकडी कुंपणाला पार करत तो आपल्या प्रिय सहकाऱ्यांना भेटण्यासाठी आलाच. यासाठी थोडे कष्ट आणि वेळ लागला पण प्रयत्न सोडले नाहीत आणि शेवटी ते त्यांच्या प्रियजनांपर्यंत पोहोचू शकला.

ही क्लिप भारतीय वन सेवा (IFS) अधिकारी सुशांत नंदा यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केली आहे. याला १५ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. सुमारे 28 सेकंदांच्या या व्हिडिओवर लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

सोशल मीडियावर या व्हिडिओला लोक मोठ्या प्रमाणात पसंती देत ​​आहेत. यामुळेच अनेक यूझर्सनी व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया नोंदवली. एका यूझरने म्हटले, की माणसेही अशी असावीत. दुसरीकडे, आणखी एका यूझरने लिहिले, की कोणतीही भिंत प्रेमाला रोखू शकत नाही, अप्रतिम! दुसर्‍या यूझरने लिहिले, की धीर धरा आणि शांतपणे प्रयत्न करत राहा, यामुळेच तो त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचला. याशिवाय इतर अनेक यूझर्सनी या व्हिडिओचे वेगवेगळ्या प्रकारे कौतुक केले.

Web Title: elephant crosses wooden fence to meet friend elephants video goes viral on internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.