अखेर वाचवलेच! खड्ड्यात पडलेल्या हत्तीचा 'हा' थरारक व्हिडिओ पाहुन तुम्ही गावकऱ्यांचे कराल कौतूक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 05:53 PM2021-07-25T17:53:03+5:302021-07-25T17:53:12+5:30
अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. पण त्यातही काही व्हिडिओ आपल्या काळजाचा ठाव घेतात. त्या व्हिडिओंना आपण सारखं बघत राहतो. असाच एका सतत बघावा असं वाटणारा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओत एक हत्ती धडपडतोय. कशासाठी? पाहा तुम्हीच...
जगात खुप सुंदर गोष्टी असतात. त्या घडतात तेव्हा तिथे आपणं असणं आपल्याला हवंहवंस वाटू शकतं. पण तंत्रज्ञानाचे धन्यवाद द्यायला हवेत की अशा गोष्टी आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून पाहयला मिळतात. असे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. पण त्यातही काही व्हिडिओ आपल्या काळजाचा ठाव घेतात. त्या व्हिडिओंना आपण सारखं बघत राहतो. असाच एका सतत बघावा असं वाटणारा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओत एक हत्ती धडपडतोय. कशासाठी? पाहा तुम्हीच...
Beautiful people. Amazing village. Finally they save that elephants. @ANIpic.twitter.com/tdoxGSgwbu
— Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) July 23, 2021
एक हत्ती अडकलेलाय खड्ड्यात. चिखलामुळे त्याला वर येताच येत नव्हतं. अशावेळी अख्ख गाव जमा झालेलं आणि त्या हत्तीला सोडवण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली. आपण या व्हिडिओमध्ये पाहु शकता की हि माणसं हत्तीला सोडवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. कोणी दोऱ्यांच्या साह्याय्याने या निष्पाप जीवाला बाहेर काढण्यासाठी धडपड करतंय तर कुणी काठीच्या साह्याने त्याला वर उचलतंय. तो पुन्हा खड्ड्यात पडून चिखलात रुतु नये म्हणून काठीचा आधार देतंय. सर्वत्र एकच कल्ला चालूय तो फक्त या हत्तीला बाहेर काढण्यासाठी. अखेरीस अथक प्रयत्नांनी तो हत्ती बाहेर येतो. आणि रानाच्या दिशेने पळू लागतो. पण या हत्तीला बाहेर काढल्यावर गावकऱ्यांचा जो आनंद आहे तो शब्दातीत आहे. या व्हिडिओत हत्ती बाहेर निघाल्यावर आजूबाजूच्या लोकांचा जल्लोष तुम्ही ऐकू शकता.
Fantastic efforts by all 🙏
— G.R. Venkatagiri 🇮🇳 (@Venkatagiri_GR) July 23, 2021
माणसांनी जंगलं नष्ट करत संपूर्ण निसर्गचक्रच बिघडवलं आहे. जंगलं नष्ट करून माणसांनी घरं बनवली आहेत. अशात आता जंगली प्राणी मानवी वस्त्यांमध्ये येऊ लागले आहेत. आपल्या स्वार्थासाठी माणसांनी प्राण्यांचा निवारा हिसकावला आहे. त्यामुळे खरंच आपण प्राण्यांची मदत करतोय का असा अंतर्मुख करणारा प्रश्न एकाने कमेंट करत विचारला आहे. तर अनेकजणांनी या प्राण्याला वाचवल्याबद्दल गावकऱ्यांचे कौतुक केले आहे.
प्रवीण कासवान या आयएफएस अधिकाऱ्यांने हा व्हिडिओ ट्वीट केला आहे. त्याला आतापर्यंत दीड लाखाच्या वर व्हिव्ज मिळाले आहेत. एनआय या वृत्तसंस्थेचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलंय. सुंदर लोक... भन्नाट गाव, शेवटी त्यांनी हत्तीला वाचवलेच.