Elephant Fight Video : दोन हत्तींची अशी भीषण झुंज तुम्ही कधीच पाहिली नसेल; एका धडकेत झाडाचाही चुराडा झाला - पाहा VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 04:00 PM2023-03-24T16:00:58+5:302023-03-24T16:01:41+5:30
ही झुंज पाहून आपल्याही लक्षात येईल की, यांच्या भांडणात जे काही येते ते उद्ध्वस्त होते.
हत्ती हा एक अतिशय शांत, हुशार आणि भावनिक प्राणी आहे. हत्तीमध्ये प्रचंड शक्ती असते. जिचा कुणी अंदाज लावू शकत नाही. म्हणूनच जेव्हा एखाद्या हत्तीला राग येतो किंवा तो बिथरतो, तेव्हा अगदी 'जंगलाचा राजा' सिंहही नाद करत नाही. या महाकाय प्राण्याचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. या प्राण्याचा असाच एक नवा व्हिडिओ आता सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून आपल्याही अंगावर शहारा येईल. या व्हिडिओमध्ये दोन हत्ती भांडतांना अथवा झुंजताना दिसत आहेत. ही झुंज पाहून आपल्याही लक्षात येईल की, यांच्या भांडणात जे काही येते ते उद्ध्वस्त होते. हा व्हिडिओ दक्षिण आफ्रिकेतील उत्तर-पूर्व भागात असलेल्या क्रुगर नॅशनल पार्कमधील (Kruger National Park) असल्याचा दावा केला जात आहे.
जेव्हा झाडावर गेला हत्ती-
हा व्हिडीओ केवळ 28 सेकंदांचा आहे. यात दोन महाकाय हत्ती रस्त्यावर भांडताना दिसत आहेत. हे दोन्ही हत्ती एकमेकांना जोरदार धडका देत आहेत. त्याच्या जवळच एक झाडही आहे. भांडताना हे हत्ती त्या झाडाच्या अगदी जवळ जातात. दरम्यान, एक हत्ती दुसऱ्या हत्तीला एवढी जोराची धडक देतो की, दुसरा हत्ती थेट त्या झाडावरच जातो. यामुळे या झाडाचा पार चुराडा होतो आणि ते जमिनीवर कोसळते. मात्र, हत्ती स्वत:ला सावरत रस्त्यावर येतो आणि येथेच व्हिडिओ संपतो. आता या लढाईत कोणता हत्ती जिंकला आणि कोणता हत्ती हरला? हे समजू शकलेले नाही. मात्र हत्तीची शक्ती पाहून, बरे झाले जंगल जंगल सफारीसाठी गेलेले लोक हत्तापासून दूरच राहीले, अशा प्रतिक्रिया लोक सोशल मिडियावर देत आहेत.
When elephants fight, it is the grass and trees that bear the scars. 🐘🐘
— SANParks (@SANParks) March 23, 2023
__
🎥Campfire Academy📍#KrugerNationalPark#LiveYourWild#SANParkspic.twitter.com/xgEJcU6Zqg
या प्राण्यांमध्ये असते कमालीची ताकद -
हा व्हिडिओ @SANParks नावाच्या ट्विटरवर 23 मार्चला पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शन मध्ये म्हणण्यात आले आहे, जेव्हा हत्ती झुंजतात, तेव्हा झाडांचेही नुकसान होते. या व्हिडिओला आतापर्यंत 20 हजारहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. तसेच 78 हजारहून अधिक वेळा हा व्हिडिओ बघण्यात आला आहे. यावर युजर्स प्रतिक्रियाही देत आहेत. काही लोकांनी म्हटले आहे, की हे झाड तर असे तुटले, जसे एखादी काडेपेटीतील काडी. तसेच एकाने म्हटले आहे, की या विशालकाय प्राण्यांमध्ये कमालीची ताकद असते. तसेच काही लोकांनी हा व्हिडिओपाहून आश्चर्यही व्यक्त केले आहे.