'ती'आई होती म्हणूनी... प्रवाहासोबत वाहून जाणाऱ्या पिल्लाला हत्तीणीने वाचविले; व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2019 05:59 PM2019-08-25T17:59:02+5:302019-08-25T18:04:12+5:30

व्हिडीओमध्ये हत्तींचा कळप एक दुथडी भरून वाहणारी नदी पार करताना दिसत आहे. पण या कळपासोबत असलेलं हत्तीचं पिल्लू नदी पार करता करता धडपताना दिसत आहे. 

Elephant Mom Saves Baby Stuck In River | 'ती'आई होती म्हणूनी... प्रवाहासोबत वाहून जाणाऱ्या पिल्लाला हत्तीणीने वाचविले; व्हिडीओ व्हायरल

'ती'आई होती म्हणूनी... प्रवाहासोबत वाहून जाणाऱ्या पिल्लाला हत्तीणीने वाचविले; व्हिडीओ व्हायरल

Next

आई सारखे दैवत साऱ्या जगतामध्ये नाही.... आईची महती सांगणारं हे वाक्य आपल्या सर्वांनाच माहीत आहे. आपल्या मुलांसाठी आई काहीही करू शकते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हत्तींचा कळप एक दुथडी भरून वाहणारी नदी पार करताना दिसत आहे. पण या कळपासोबत असलेलं हत्तीचं पिल्लू नदी पार करता करता धडपताना दिसत आहे. 

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये हत्तीचं हे पिल्लू पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून जाऊ लागतं. पण त्याची आई प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून पिल्लाला वाचवण्यासाठी फार प्रयत्न करताना दिसत आहे. 

'The Dodo' या ट्विटर हॅन्डवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ 2 लाख 23 हजार लोकांनी पाहिला असून तीन हजार तीनशे रिट्विट्स आहे. तर 14 हजार लोकांनी लाइक केला आहे. 

व्हिडीओमध्ये एक हत्तीचा कळप दुथडी भरून वाहणारी नदी पार करत आहे. त्या कळपामध्ये एक छोटसं पिल्लू नदी पार करत आहे. पण पाण्याच्या प्रवाहचं एवढा आहे की, त्याला नदी पार करणं फार कठिण होत आहे. तरिही ते प्रयत्न सोडत नाही. पण दुसऱ्या किनाऱ्याजवळ येताच वाढलेल्या प्रवाहामुळे ते पिल्लू पाण्यासोबत वाहून जाऊ लागतं. पण त्याच्या मागेच असणाऱ्या आणि त्याला नदी पार करताना सतत आधार देणारी त्याची आई त्याला अडवते. त्याचवेळी कळपातील इतर हत्ती येतात आणि पिल्लाला किनाऱ्यापर्यंत घेऊन जातात. 

नदी पार करण्यासाठी पिल्लाचे प्रयत्न आणि त्याच्या पाठीशी असणाऱ्या आणि त्याला सावरणाऱ्या त्याच्या आईचे नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे.  

Web Title: Elephant Mom Saves Baby Stuck In River

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.