video : जेसीबीनं खड्ड्यात पडलेल्या हत्तीला वाचवलं, बाहेर आल्यानंतर त्यानं जे केलं ते पाहाच
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 04:42 PM2021-05-20T16:42:39+5:302021-05-20T16:56:24+5:30
elephant rescue operation video : कर्नाटकमधील कुर्ग जिल्ह्यातील हा व्हिडिओ असल्याचे सांगण्यात येत आहे. येथे सतत पडणाऱ्या पावसामुळे चिखल झाला आहे आणि यामुळे नकळत एक हत्ती मोठ्या खड्ड्यात पडला.
हत्ती जगातील सर्वात समजूतदार प्राणी आहे. याशिवाय, त्याच्या वजनाबद्दलही उत्सुकतेची बाब आहे. अशा परिस्थितीत ज्यावेळी एक हत्ती खड्ड्यात पडला, त्यावेळी जेसीबीच्या मदतीने त्याला कसे बाहेर काढले गेले. यासंबंधीचा बचाव व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओतील घटना कर्नाटकातील आहे. हत्तीला कसे वाचविले, याबाबत लोक सोशल मीडियावर प्रशासनाचे कौतुक करत आहेत. (elephant rescue operation video in coorg,karanataka;went viral on social media)
भारतीय वन सेवेमध्ये काम करणार्या सुधा रमणने तिच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओचे क्रेडिट सतीश शहा यांना देण्यात आले आहे. कर्नाटकमधील कुर्ग जिल्ह्यातील हा व्हिडिओ असल्याचे सांगण्यात येत आहे. येथे सतत पडणाऱ्या पावसामुळे चिखल झाला आहे आणि यामुळे नकळत एक हत्ती मोठ्या खड्ड्यात पडला.
#Elephant rescue operation from Coorg. Every operations are different based on terrain, animal involved &other factors. Animal safety is important.
— Sudha Ramen IFS 🇮🇳 (@SudhaRamenIFS) May 19, 2021
Why was tat smoke cracker? To direct the animal into forest, so that it doesn't attack anyone due to stresspic.twitter.com/AfK9tnUKLJ
या हत्तीने खड्ड्यातून बाहेर येण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र, खड्ड्यातून बाहेर येण्यास तो अयशस्वी झाला. त्यानंतर येथील वनविभाग आणि प्रशासनाने या हत्तीला बाहेर काढण्यासाठी जेसीबीची मदत घेतली. जेसीबीच्या मदतीने हत्तीला बाहेर काढण्यात आले. यावेळी हत्ती स्वतःच सतत प्रयत्न करत असल्याने आणि त्याला बाहेर काढण्यात खूप मदत झाली.
या व्हिडिओमध्ये, खड्ड्यातून बाहेर आल्यानंतर घाबरलेला हत्ती जेसीबी बरोबर दोन हात करण्याच्या मूडमध्ये दिसून येत आहे. मात्र, परंतु जेसीबी चालकाने त्याला जंगलाकडे जाणारा रस्ता दाखविला जेणेकरून तो सुरक्षितपणे जंगलाच्या दिशेने जाईल. दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत दहा लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर चार हजाराहून अधिक लोकांनी लाईक केला आहे.