हत्तींचा मार्ग झाला Block, रेल्वे मंत्रालयानं उचललं ह्दयस्पर्शी पाऊल; तुम्हीही कराल कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 04:28 PM2022-02-04T16:28:09+5:302022-02-04T16:28:48+5:30

काही सेकंदांनंतर, कळप रुळांवरून वर चढून जंगलात प्रवेश करताना दिसतो. सुदैवाने त्यावेळी रुळावरुन कुठलीही ट्रेन आली नाही.

Elephant route became a block, a heart touching step taken by the Ministry of Railways; You will appreciate | हत्तींचा मार्ग झाला Block, रेल्वे मंत्रालयानं उचललं ह्दयस्पर्शी पाऊल; तुम्हीही कराल कौतुक

हत्तींचा मार्ग झाला Block, रेल्वे मंत्रालयानं उचललं ह्दयस्पर्शी पाऊल; तुम्हीही कराल कौतुक

googlenewsNext

हत्तींचा कळप रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असलेले कुंपण ओलांडण्याचा प्रयत्न करत असल्याचा निराशाजनक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना तामिळनाडूमधील निलगिरी येथे घडली आणि ही क्लिप IAS अधिकारी सुप्रिया साहू यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केली. मात्र, त्यानंतर तातडीनं प्राण्यांना ओलांडण्यासाठी सुरक्षित रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने कारवाई केली.

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये हत्तींचा कळप रेल्वे रुळांच्या बाजूची संरक्षक भिंती ओलांडण्यासाठी धडपडताना दिसत आहे. त्यांना पलीकडे असलेल्या जंगलात जायचे होते पण कुंपणामुळे ते शक्य झाले नाही.

हत्तींचा जंगलात जाण्याच्या मार्गात अडथळा

काही सेकंदांनंतर, कळप रुळांवरून वर चढून जंगलात प्रवेश करताना दिसतो. सुदैवाने त्यावेळी रुळावरुन कुठलीही ट्रेन आली नाही. सुप्रिया साहू यांनी हा व्हिडीओ पोस्ट करत हे त्रासदायक असून वन्यजीवांच्या सोयीस्कर आराखडा बनवावा लागेल असं म्हटलं. त्या म्हणाल्या की, 'हत्तींच्या कळपाला धोकादायक रेल्वे ट्रॅकवरून जावे लागले हे पाहून वाईट वाटले. संवेदनशील वन्यजीव अनुकूल रचना आणि अंमलबजावणीसाठी सर्व मूलभूत एजन्सींसाठी अनिवार्य SOP आवश्यक आहे असं त्यांनी सांगितले.

रेल्वे मंत्रालयानं पुन्हा उचललं हृदयस्पर्शी पाऊल

सोशल मीडियात ही पोस्ट व्हायरल झाली असून व्हिडिओला 90k पेक्षा जास्त व्ह्यू मिळाले आहेत. दरम्यान, सुप्रिया साहू यांनी परिस्थितीबाबत नवीन अपडेट शेअर केले. दुसर्‍या क्लिपमध्ये, एक माणूस प्राण्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी ट्रॅकच्या बाजूची भिंत पाडताना दिसतो. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, 'जेव्हा आम्ही एकत्र काम करतो तेव्हा आम्ही उपाय शोधतो. भिंत पाडली जात आहे. उत्कृष्ट टीमवर्क.' नेटिझन्सनं केलेल्या कमेंट्सचं कौतुक करत रेल्वे मंत्रालयाने केलेल्या तत्पर कारवाईचे स्वागत केले आहे.

टॅग्स :railwayरेल्वे