Video : हत्तीची 'टोल' वसूली! ऊस भरून नेणारा ट्रक अडवला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 09:45 AM2023-03-09T09:45:29+5:302023-03-09T09:46:11+5:30
Elephant Video : सध्या हत्तीचा असाच एक खास आणि चेहऱ्यावर हसू फुलवणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Elephant Video : सोशल मीडियावर हत्तींचे हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी आपल्या पिल्लांसोबत तर कधी एखाद्या मंदिरात. हत्ती हा किती हुशार प्राणी आहे हेही या व्हिडिओतून अनेक बघायला मिळत असतं. सध्या हत्तीचा असाच एक खास आणि चेहऱ्यावर हसू फुलवणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
IFS अधिकारी सुशांता नंदा यांनी त्यांच्या ट्विटर हॅंडलवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा थायलॅंडमधील व्हिडीओ असल्याचं त्यांनी पोस्टमध्ये सांगितलं. तुम्ही या व्हिडिओत बघू शकता की, रस्त्याने ऊसाचा एक ट्रक जात आहे. हत्ती ट्रकसमोर आडवा झाला आणि जशी टोल वसुली करावी तसा ट्रकमधून ऊस काढून खाल्ला. ट्रकवाल्याने सुद्धा गाडी थांबवली. नंतर मागून आणखी एक ट्रक आला तोही थांबला.
Elephants have the right of way. This privilege is at display to stop passing sugar cane trucks for tasty snax. Viral video from Thailand. pic.twitter.com/8RPTWhF3Of
— Susanta Nanda (@susantananda3) March 8, 2023
हत्तीची ही हुशारी पाहून अनेकांच्या चेहऱ्यावर हसू फुलत आहे. अनेकांनी या व्हिडिओवर वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. काही म्हणाले हा त्याचा अधिकार आहे तर काही म्हणाले त्यांनीही कधी ऊस खावा. एकाने कमेंट केली की, आज हत्तीची पार्टी झाली.
या व्हिडिओला 294 के व्ह्यूज मिळाले आहेत तर 9 हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. लोक हा व्हिडीओ रिट्विट करत आहेत.