VIDEO : इतकं चांगलं पेंटिंग तर तुम्हीही करू शकणार नाही, हत्तीने स्वत:चं चित्र काढून केलं अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2022 04:12 PM2022-02-05T16:12:32+5:302022-02-05T16:14:20+5:30

Elephant Painting Video: आम्ही तुम्हाला एक असा व्हिडीओ दाखवणार आहोत, ज्यात एक हत्ती हत्तीचं पेंटिंग करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Elephant surprised by making picture of himself even you can not make such a nice painting | VIDEO : इतकं चांगलं पेंटिंग तर तुम्हीही करू शकणार नाही, हत्तीने स्वत:चं चित्र काढून केलं अवाक्

VIDEO : इतकं चांगलं पेंटिंग तर तुम्हीही करू शकणार नाही, हत्तीने स्वत:चं चित्र काढून केलं अवाक्

googlenewsNext

Elephant Painting Video: आपण नेहमीच असे लोक बघत असतो, ज्यांच्यात भरभरून टॅलेंट असतं. काही लोक फारच सुंदर पेंटिंग करतात. पण तुम्ही कधी हत्तीला पेंटिंग करताना पाहिलंय? नक्कीच पाहिलं नसेल. पण आम्ही तुम्हाला एक असा व्हिडीओ दाखवणार आहोत, ज्यात एक हत्ती हत्तीचं पेंटिंग करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक हत्ती आपल्या सोंडेने पेंटिंग काढत आहे. हा असा नजारा तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल. म्हणून हा व्हिडीओ बघून तुम्ही अवाक् व्हाल. हत्ती यात हत्तीचं पेटिंग काढताना दिसत आहे. बघून शकता की, आपल्या सोंडेत ब्रश पकडून हत्ती समोरच्य कॅनव्हासवर पेंटिंग काढत आहे. 

हत्ती  इतकं परफेक्ट पेंटिंग काढताना दिसत आहे की, हे बघताना आपलाच आपल्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. सर्वातआधी हत्ती सोंड काढतो, नंतर चार पाय काढतो. शेवटी तो शेपटी काढतो. हत्तीला अशाप्रकारे पेंटिंग काढताना पाहून सोशल मीडिया यूजर्स हैराण झाले आहेत. 

हा व्हिडीओ IFS अधिकारी प्रवीण अंदुसामी यांनी आपल्या ऑफिशिअल ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. ४५ सेकंदाच्या या व्हिडीओ आतापर्यंत २० हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलाय. तर १८०० पेक्षा जास्त लोकांनी व्हिडीओ लाइक केलाय. व्हिडीओ बघून लोक हत्तीच्य टॅलेंटचं भरभरून कौतुक करत आहेत. 

Web Title: Elephant surprised by making picture of himself even you can not make such a nice painting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.