हत्तींचा कळपाला वाट देण्यासाठी चालकाने थांबवली गाडी, गजराजाने 'अशापद्धतीने' दिले धन्यवाद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 02:55 PM2022-04-19T14:55:18+5:302022-04-19T14:58:58+5:30

एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, जो पाहून तुम्हाला कळेल की प्राणीही माणसांबद्दल कृतज्ञता कशी व्यक्त करतात.

elephant thank car driver for stopping vehicle to let pass elephants cute video goes viral on internet | हत्तींचा कळपाला वाट देण्यासाठी चालकाने थांबवली गाडी, गजराजाने 'अशापद्धतीने' दिले धन्यवाद

हत्तींचा कळपाला वाट देण्यासाठी चालकाने थांबवली गाडी, गजराजाने 'अशापद्धतीने' दिले धन्यवाद

Next

जंगलाच्या मधोमध एखादी व्यक्ती गाडीने जात असेल तर त्याने गाडी सावधपणे चालवावी याकडे विशेष लक्ष द्यावं लागतं. कारण अनेकदा जंगलाच्या मध्यभागी बनवलेले रस्ते ओलांडून अनेक प्राणी जात असतात आणि अशा परिस्थितीत मोठा अपघात होऊ शकतो, त्यामुळं धोका वाढतो. मात्र, या सर्वाची काळजी घेऊन माणूस जेव्हा चांगली गाडी चालवतो, तेव्हा प्राणीसुद्धा माणसांप्रती कृतज्ञता व्यक्त करायला चुकत नाहीत. अलीकडेच असंच दृश्य पाहायला मिळालं, जेव्हा एका माणसाने काही हत्तींसाठी आपली कार थांबवली (Elephant thanked man for stopping car).

आपल्या मजेशीर आणि आश्चर्यकारक व्हिडिओंसाठी प्रसिद्ध ट्विटर अकाऊंट Buitengebieden वर प्राण्यांशी संबंधित अनेक मजेदार व्हिडिओ (Viral Video of Elephant) शेअर केले जातात. ज्यामध्ये प्राण्यांची मस्ती स्पष्टपणे दिसते. नुकताच या पेजवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, जो पाहून तुम्हाला कळेल की प्राणीही माणसांबद्दल कृतज्ञता कशी व्यक्त करतात (Elephant showed gratitude to man).

व्हिडिओमध्ये दोन्ही बाजूला जंगल असलेला रस्ता दिसतो. अचानक एका बाजूने हत्तींचा मोठा कळप निघतो आणि रस्ता ओलांडून दुसऱ्या बाजूला असलेल्या जंगलात जाऊ लागतो (Elephants crossing road). व्हिडिओ बनवणारी व्यक्ती बहुधा कारमध्ये बसून हा क्षण रेकॉर्ड करत आहे. हे दृश्य अगदीच अनोखं आहे कारण एका कळपात अनेक हत्ती रस्ता ओलांडून एका बाजूवरुन दुसऱ्या बाजूला जात आहेत. पण त्याहून अनोखी गोष्ट म्हणजे जेव्हा सर्व हत्ती जवळजवळ निघून जातात, तेव्हा शेवटी उरलेला हत्ती मागे थांबतो. तो व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीकडे पाहतो आणि त्याच्या समोर आपली सोंड उचलतो. हे पाहून असंच जाणवतं की हत्ती या चालकाचे आभार मानत आहे किंवा त्याचा निरोप घेत आहे (Elephant wave trunk at man).

हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून आतापर्यंत ५ मिलियनहून अधिकांनी पाहिला आहे. तर २९ लाखांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाइक केलं आहे. लोकांचं म्हणणं आहे, की हत्तीचाही आपला असा वेगळा स्वॅग आहे. तो कार चालकाची विचारपूस करत होता. दुसऱ्या एकाने कमेंट करत म्हटलं की, तो आभार मानत नव्हता, तर चालकाने कळपाजवळ येऊ नये, असा इशारा देत होता. एका व्यक्तीने म्हटलं की, हत्ती खूप गोंडस दिसत आहे. तर काहींनी हत्ती रागात असल्याचंही म्हटलं

Web Title: elephant thank car driver for stopping vehicle to let pass elephants cute video goes viral on internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.