गावात घुसलेल्या 14 हत्तींनी 30 लिटर वाईन संपवली अन् पुढे काय झालं ते बघा...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 03:37 PM2020-03-20T15:37:37+5:302020-03-20T15:44:02+5:30
आजपर्यंत तुम्ही दारू ढोसून रस्त्यावर किंवा इकडे तिकडे पडलेली माणसे अनेकदा पाहिली असतील. मात्र, या दोन हत्तींनी माणसांना याबाबत मागे सोडलं आहे.
सोशल मीडियात हत्तींचे दोन फोटो व्हायरल झाले असून या फोटोंची जोरदार चर्चा रंगली आहे. इतकी चर्चा व्हायला कारणही तसंच आहे. आजपर्यंत तुम्ही दारू ढोसून रस्त्यावर किंवा इकडे तिकडे पडलेली माणसे अनेकदा पाहिली असतील. मात्र, या दोन हत्तींनी माणसांना याबाबत मागे सोडलं आहे. एका गावात 14 हत्ती शिरले आणि त्यांनी 30 लिटर वाइन सेवन केली. पुढे जे झाले ते या फोटोत आहे.
चीनच्या Yunnan मधील एका गावातील ही घटना आहे. 14 हत्तींचा एक कळप गावात शिरला आणि त्यांनी तिथे ढिंगाणा घातला. एका ट्विटनुसार, आधी हत्तींनी कॉर्न आणि खाण्यासाठी शोध घेतला. नंतर त्यांनी वाइनचं संपवली.
While humans carry out social distancing, a group of 14 elephants broke into a village in Yunan province, looking for corn and other food. They ended up drinking 30kg of corn wine and got so drunk that they fell asleep in a nearby tea garden. 😂 pic.twitter.com/ykTCCLLCJu
— Corono she better don’t (@Spilling_The_T) March 18, 2020
मिळालेल्या माहितीनुसार, या हत्तींनी 30 लिटर कॉर्न वाइन फस्त केली. त्यानंतर दोन हत्ती गाढ झोपी गेले. आरामात ते झोपलेले दिसत आहे. आयएफएस प्रविण कासवान यांनीही हा फोटो शेअर केला आहे.
Meanwhile few #elephants decided to use alcohol to sanitize trunks in Wunnan, China. They were raiding crops somehow found wine. And the look after drinking too much. As a fact elephants are fond of alcohol, they are good at finding that also, especially Handiya in tribal belts. pic.twitter.com/K77fYuiFqr
— Parveen Kaswan (@ParveenKaswan) March 18, 2020
Amazing. Except. Hungover elephants. Hide from hungover elephants.
— Sue Kirk (@SueKirk) March 18, 2020
I know that they had the best sleep ever from the position
— Tequila Mockingbird (@somesayju) March 19, 2020
हत्तींच्या या फोटोंवर लोक मजेदार कमेंटही करत आहेत. काही लोक म्हणाले की, हत्तींना हॅंगओव्हर झाला आहे.