Video - "पप्पा, मी CA झाली"; चहावाल्याच्या लेकीची नेत्रदिपक भरारी, वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 05:43 PM2024-07-22T17:43:12+5:302024-07-22T17:45:49+5:30
एका चहावाल्याची मुलगी अमिता प्रजापतीने सीए परीक्षेत यश मिळवलं आहे, जिची गोष्ट प्रत्येकालाच प्रेरणा देत आहे.
सध्या सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल होत आहे. असं म्हणतात की जर तुम्ही मेहनत केली तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट लोकांचं लक्ष वेधून घेत आहे, ज्याबद्दल जाणून घेतल्यावर तुम्हालाही कौतुक वाटेल. आपली लेक सीए झाल्याचं समजताच वडील कसे भावूक होतात, हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
दिल्लीतील एका चहावाल्याची मुलगी अमिता प्रजापतीने सीए परीक्षेत यश मिळवलं आहे, जिची गोष्ट प्रत्येकालाच प्रेरणा देत आहे. आर्थिक परिस्थिती चांगली नसतानाही वडिलांनी खूप कष्ट केले आणि आपल्या मुलीच्या शिक्षणात कोणतीही कसर सोडली नाही आणि शेवटी 10 वर्षांनी त्यांच्या मेहनतीला फळ मिळालं. व्हायरल होत असलेल्या या पोस्टवर युजर्स अमिताचं अभिनंदन करत आहेत. तर दुसरीकडे वडिलांनाही सलाम करत आहोत.
पापा मैं सीए बन गई…', चाय वाले की बेटी ने दी खुशखबरी, गले से लिपट कर रोने लगे पिता, झुग्गी में रहता है परिवार #capic.twitter.com/4PsLyADAyg
— Abhishek Pandey (@Thepandeyjii) July 21, 2024
आपल्या वडिलांना आपल्या यशाबद्दल सांगताना अमिता आनंदाने रडत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. वडील आणि मुलीचा हा हृदयस्पर्शी व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लिंक्डइन प्रोफाइलवर शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये मुलगी आपल्या वडिलांना मिठी मारताना दिसत आहे. व्हिडिओसोबतच एक खूप मोठी पोस्टही शेअर केली आहे.
"लोक म्हणायचे की, तुम्ही चहा विकून मुलीला शिकवू शकत नाही. पैसे वाचवा आणि घर बांधा. तरुण मुलींसोबत फूटपाथवर किती दिवस राहणार? एक दिवस ती निघून जाईल आणि तुमच्याकडे काहीही शिल्लक राहणार नाही. होय, मी झोपडपट्टीत राहते, पण मला लाज नाही. मी आज जे काही आहे ते माझ्या वडिलांमुळे आहे. त्यांचा माझ्यावर नेहमीच विश्वास होता आणि एक दिवस मी त्यांना सोडून जाईन असे कधीच वाटले नव्हते, उलट त्यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित केलं" असं पोस्टमध्ये म्हटलं आहे.