कोरोनाकाळात लेकीला जन्म देताच कोमात गेली आई; अखेर ७५ दिवसांनी चिमुकलीला घेतलं कुशीत

By manali.bagul | Published: February 5, 2021 12:46 PM2021-02-05T12:46:40+5:302021-02-05T12:57:44+5:30

Viral Trending News in Marathi : ४ नोव्हेंबर २०२० ला तिनं गोंडस बाळाला जन्म दिला. त्याचवेळी कोरोनाचा सामना करावा लागल्यानं केल्सी कोमात गेली होती.

Emotional Story Of Mother met her newborn baby after three months of coma | कोरोनाकाळात लेकीला जन्म देताच कोमात गेली आई; अखेर ७५ दिवसांनी चिमुकलीला घेतलं कुशीत

कोरोनाकाळात लेकीला जन्म देताच कोमात गेली आई; अखेर ७५ दिवसांनी चिमुकलीला घेतलं कुशीत

Next

कोरोनाकाळात गर्भवती असलेल्या महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. Kelsey Townsend नं आपल्या नवजात मुलीला  तीन महिन्यांनी कुशीत घेतलं आहे. असोसियेट प्रेसनं दिलेल्या माहितीनुसार  ३२ वर्षीय केल्सी अमरिकेतील रहिवासी आहे. ४ नोव्हेंबर २०२० ला तिनं गोंडस बाळाला जन्म दिला. त्याचवेळी कोरोनाचा सामना करावा लागल्यानं केल्सी कोमात गेली होती.

७५ दिवसांनी जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा तिनं आपल्या चिमुकलीला जवळ घेतलं आहे. एसएसएम हेल्थ सेंट मेरी हॉस्पीटल मॅडिसनमध्ये केल्सीला दाखल करण्यात आलं होतं.  तब्बल ७५ दिवसांनी जेव्हा केल्सी कोमातून बाहेर आली तेव्हा २७ जानेवारी  २०२१ ला तिनं आपल्या चिमुकलीची भेट  घेतली.

कॅमेरात कैद झाला शिकारीच्या तयारीत असलेला दुर्मिळ काळा बिबट्या; पाहा रुबाबदार बिबट्याचे फोटो

इंडिया टाईम्सनं दिलेल्या माहितीनुसार केल्सीनं सांगितेल की, ''आम्ही दोन्ही एकमेकांना भेटण्याआधीच एकमेकांपासून लांब झालो. पहिल्यांदा जेव्हा मी मुलीला पाहिलं तेव्हा ती माझ्याकडे पाहून हसली जणूकाही ती मला ओळखते.  या गोष्टीचा मला खूप आनंद झाला. '' रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, ''कोरोनाकाळात एका मुलीला जन्म  देऊन ही महिला कोमात गेली आणि  योग्य उपचारांनंतर आज मुलगी आणि आई दोन्ही सुरक्षित आहेत.''

 कुत्र्याच्या भीतीनं कडेकडेनं चालत होता; मागून मालकानं असं काही केलं अन् तो हवेतच उडाला, पाहा व्हिडीओ

केल्सीच्या पतीनं सांगितले की, ''अनेक दिवस आणि रात्री अशा गेल्या ज्यावेळी केल्सीची तब्येत गंभीर असल्याचे डॉक्टरांकडून कानी पडायचे. यामुळे केल्सी कधीही बरी होणार नाही असंही मला वाटायचं मी केल्सीला सांगितले की जेव्हा ती कोमात होती तेव्हा चिमुकली सारखी इकडे तिकडे मान फिरवायची  जणूकाही तिला आईला भेटण्याची ओढ लागली होती.'' केल्सी आणि तिचे पती या दोघांनाही कोरोनाचं संक्रमण झालं होतं. पती लगेचच यातून बाहेर आले. परंतू केल्सीला बरं होण्यासाठी जवळपास ७५ दिवसांचा कालावधी लागला.
 

Web Title: Emotional Story Of Mother met her newborn baby after three months of coma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.