अतूट नातं! पहिल्या पगारातून मोठ्या भावाने छोट्यासाठी आणलं खास गिफ्ट; Video पाहून डोळे पाणावतील

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 05:10 PM2022-12-20T17:10:37+5:302022-12-20T17:11:49+5:30

सोशल मीडियावर दोन भावांच्या प्रेमाचा एक सुंदर व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे, जो पाहून सर्वांचेच डोळे पाणावले आहेत. 

emotional video brother uses first pay cheque to buy sneakers for younger sibling | अतूट नातं! पहिल्या पगारातून मोठ्या भावाने छोट्यासाठी आणलं खास गिफ्ट; Video पाहून डोळे पाणावतील

अतूट नातं! पहिल्या पगारातून मोठ्या भावाने छोट्यासाठी आणलं खास गिफ्ट; Video पाहून डोळे पाणावतील

Next

भाऊ-बहीण किंवा मग भावा-भावातलं नातं हे अनमोल असतं. कधी गरज असेल किंवा एखादी नवी वस्तू हवी असेल तर हमखास मस्का मारला जातो. तर कधी टोकाची भांडणं ही केली जातात. या नात्याची गोष्टच वेगळी असते. सतत गमती जमती घडत असतात. आई-वडीलांआधी भावंडांसोबत काही खास गोष्टी आवर्जून शेअर केल्या जातात. सध्या सोशल मीडियावर दोन भावांच्या प्रेमाचा एक सुंदर व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे, जो पाहून सर्वांचेच डोळे पाणावले आहेत. 

एका मोठ्या भावाने आपल्या लहान भावाला त्याच्या पहिल्या पगारातून छानसं गिफ्ट दिलं आहे. ते पाहून लहान भाऊ खूप खूश होतो आणि आनंदाने आपल्या दादाला मिठी मारतो. भावंडांच्या या प्रेमाचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. त्याला 24 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. मोठ्या भावाचं आपल्या लहान भावावर असलेलं प्रेम पाहून सर्वांनाच छान वाटलं आहे. त्यांनी मुलाचं कौतुक केलं आहे.  

goodnews_movement या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. य़ामध्ये मोठा भाऊ आपल्या पहिल्या पगारातून लहान भावाला मोजे आणि स्नीकर्स (शूज) देतो. एक भावनिक क्षण! असं कॅप्शन देण्यात आलं आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, लहान भाऊ झोपला होता. मोठा भाऊ त्याच्याकडे जातो आणि त्याला आश्चर्यचकित करतो. जेव्हा लहान भाऊ गिफ्ट पाहतो. तेव्हा तो आनंदाने उडी मारतो आणि मोठ्या भावाला मिठी मारतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: emotional video brother uses first pay cheque to buy sneakers for younger sibling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.