ऑफिसमध्ये टी ब्रेक घेणं अन् वेळेवर घरी जाणं तरूणाला पडलं महागात, २० दिवसात नोकरी गमावली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 12:04 IST2025-02-27T12:03:52+5:302025-02-27T12:04:38+5:30
Viral News : गुरुग्राम येथील एका स्टार्टअपमधून या तरूणाला त्याच्या नोकरीच्या २० दिवसांनीच काढून टाकण्यात आलं.

ऑफिसमध्ये टी ब्रेक घेणं अन् वेळेवर घरी जाणं तरूणाला पडलं महागात, २० दिवसात नोकरी गमावली!
Viral News : नोकरी लागणं ही सगळ्यांसाठी महत्वाची आणि आनंदाची बाब असते. नोकरी लागली जबाबदाऱ्या वाढतात, सोबत हाती पैसेही यायला लागतात. अशात नोकरी टिकवण्यासाठी लोक वाट्टेल ते करत असतात. कामावर फोकस करतात. तेव्हा कुठं तुमची नोकरी टिकून राहते. पण तुमचा काहीच फायदा होत नसेल तर कंपनी तुम्हाला बाहेर रस्ता दाखवते. तुमचं काम चांगलं नसल्यावर तुम्हाला कंपनीनं काढणं एक वेळ ठीक आहे. पण एखाद्या शुल्लक कारणामुळे तुम्हाला नोकरीहून काढलं तर नक्कीच वाईट वाटतं. एका तरूणासोबत असंच काहीसं झालं. या तरूणाला त्याच्या कंपनीनं केवळ २० दिवसात नोकरीहून काढलं. कारण वाचाल तर तुम्हीही अवाक् व्हाल.
गुरुग्राम येथील एका स्टार्टअपमधून या तरूणाला त्याच्या नोकरीच्या २० दिवसांनीच काढून टाकण्यात आलं. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर त्यानं याची माहिती दिली असून कंपनीनं त्याच्यावर 'अॅटिट्यूड प्रॉब्लेम' असल्याचा आरोप केला. आपली ओळख जाहीर न करता त्यानं सांगितलं की, त्यानं नोकरी जॉइन केल्यापासून समस्या सुरू झाली होती. त्याला अजिबात कळत नव्हतं की, त्याला असं का लेबल लावलं जात आहे. त्यानं लिहिलं की, "मला समजलं नाही. मी त्यांना म्हटलं की, माझ्यात अॅटिट्यूड नाही. मी तरीही यावर काम करेन. पण त्यानं मला असं काही म्हटलं हेच माझ्या लक्षात आलं नाही".
चहासाठी ब्रेक घेणं खटकलं
तरूणानं पुढे आरोप लावला की, त्याच्या बॉसला मी इतर दोन सहकाऱ्यांसोबत टी ब्रेक घेण्याची समस्या होती. कथितपणे बॉस तरूणाला म्हणाला की, "ग्रुप बनवू नका, हे कंपनीसाठी चांगलं नाही". त्यानंतर बॉस आणखी एक अडचण होती. शिफ्ट संपल्यानंतर ऑफिसमधून वेळेवर निघण्यावरून बॉसनं त्याला हटकलं होतं. तरूणाला बॉस म्हणाला होता की, "तू बरोबर ७ वाजता निघत आहे, हे बरोबर नाहीये".
२०व्या दिवशी त्याला त्याच्या डेस्कऐवजी डायरेक्टरच्या कॅबिनमधून काम करण्यास सांगण्यात आलं. तो म्हणाला की, "अशाप्रकारे डायरेक्टरच्या कॅबिनमध्ये बसून कोण काम असतं?". पण तरीही त्यानं बॉसचं ऐकलं. यादरम्यान त्यानं सहकारी टी ब्रेकसाठी जात आहेत की नाही हे बघण्यासाठी कॅबिनबाहेर नजर टाकली. या गोष्टीचा डायरेक्टरला राग आला. डायरेक्टर संतापला आणि म्हणाला की, "तू बाहेर का बघत आहेस? मी इथं बोलत आहे". त्यानंतर डायरेक्टर एचआरला सांगून लगेच मला नोकरीहून काढलं.