वयाच्या १२ व्या वर्षापासून खरेदी केले BitCoin, आता १८ व्या वर्षी बनला कोट्याधीश!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 01:56 PM2021-10-21T13:56:36+5:302021-10-21T13:57:42+5:30
BitCoin या आभासी चलनानं अनेकांना रातोरात कोट्यावधींची कमाई करुन दिली आहे. सध्या एका Bitcoin ची किंमत ५० लाख रुपयांच्या घरात आहे.
BitCoin या आभासी चलनानं अनेकांना रातोरात कोट्यावधींची कमाई करुन दिली आहे. सध्या एका Bitcoin ची किंमत ५० लाख रुपयांच्या घरात आहे. Bitcoin नं ज्या लोकांचं नशीब पालटलं यात एरिक फिनमॅन नावाच्या मुलाचाही समावेश आहे. फिनमॅनच्या दाव्यानुसार Bitcoin च्या माध्यमातून कोट्याधीश होणारा तो पहिला सर्वात कमी वयाचा व्यक्ती आहे.
गेल्या १० वर्षात एरिक फिनमॅनकडील जवळपास १०० Bitcoin होल्डिंग्जची किंमत जवळपास ५० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. एरिनं १०० Bitcoin २०११ साली जवळपास १ हजार डॉलर म्हणजेच४७ हजार रुपयांना खरेदी केले होते. त्यावेळी एरिक अवघ्या १२ वर्षांचा होता. वयाच्या १२ व्या वर्षी एरिकनं आपली पहिली गुंतवणूक केली आणि आज तो १८ वर्षांचा असून तो कोट्याधीश बनला आहे. १८ व्या वर्षी इडाहो ट्विनपासून ते सिलिकॉल व्हॅली क्रिप्टो कोट्याधीश होण्यापर्यंतचा प्रवास करणाऱ्या एरिक फिनमॅनबाबत जाणून घेऊयात...
२०११ साली वयाच्या १२ व्या वर्षी एरिक फिनमॅननं १० डॉलर किमतीचं बिटकॉइन खरेदी केलं होतं. वयाच्या १५ व्या वर्षी एरिकला शाळेतून काढून टाकण्यात आले हंतो. त्यानंतर एरिकनं १०० Bitcoin खरेदी केले. त्यानंतर त्यानं एका शिक्षण क्षेत्राशी संबंधित स्टार्टअपची स्थापना केली. वयाच्या १८ व्या वर्षी बिटकॉइनच्या माध्यमातून तो कोट्याधीश झाला आहे. विशेष म्हणजे वयाच्या २१ व्या वर्षी एरिकनं एक सॅटलाइट देखील लॉन्च केलं आहे. याच वर्षी म्हणजे २०२१ मध्ये बिटकॉइनमधून कोट्यधीश ठरलेल्या एरिक फिनमॅन यानं आपला स्वत:चा एक स्मार्टफोन घेऊन आला आहे. ज्यास 'फ्रिडम फोन' असं संबोधलं जात आहे. फोनचं नाव तुम्हाला याआधीही ऐकल्यासारखं वाटत असेल पण हा फोन पूर्णपणे वेगळा आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हा फोन कोणत्याही सेंसरविना चालणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.