थारमध्ये हाय पावर, म्हणून नांगरला वावर! आनंद महिंद्रांनाही चक्कर आली असेल! असा उपयोग...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2023 01:26 PM2023-06-13T13:26:31+5:302023-06-13T13:29:18+5:30
महिंद्राचे गेल्या कित्येक वर्षांपासून ट्रॅक्टर भारताच्या शेतीसाठी उपयोगी येत आहेत.
महिंद्राची थार विकत घेण्यासाठी अनेकजण वर्ष वर्षभर थांबले आहेत. कारण वेटिंगच तेवढे आहे. काही मोजकेच डीलर ती देखील ऑटोमॅटीक थार, ज्या व्हेरिअंटला मागणी नाहीय ती लगेच देत आहेत. परंतू, काहीजण, ज्यांना ही कार मिळालीय ते वेगवेगळ्या करामती करत आहेत. असाच एक व्हिडीओ पुण्याचा एका भागातून व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ पाहून आनंद महिंद्रांना देखील काही काळ डोळ्यासमोर भोवळ येईल, असा आहे. महिंद्राचे गेल्या कित्येक वर्षांपासून ट्रॅक्टर भारताच्या शेतीसाठी उपयोगी येत आहेत. परंतू, पुण्यातील इंदापूर तालुक्यातल्या लोणी देवकर गावातील या शेतकऱ्याने चक्क थारलाच शेतीसाठी जुंपले आहे. त्याने थार गाडीला दोर बांधून त्याला नांगर बांधला आहे. तो थारने ओढत त्याने जमिन नांगरली आहे.
या करामती शेतकऱ्याचे नाव अनिल तोंडे असे आहे. आता ट्रॅक्टरपेक्षा थारला मायलेज जास्त आहे. यामुळे या शेतकऱ्याचे इंधनावरील पैसेही वाचले असतील. पहा हा व्हिडीओ...
Farmer Loni Deokar of Indapur taluka has used a "Thar car" for plowing his farm. One acre area is plowed with a Thar cart. The cart was plowed at the back by a bullock plow attached to a stake.@anandmahindrapic.twitter.com/8rROICazPy
— Dushyant Sisode (दुष्यंत सिसोदे) (@dushyantsisode) June 13, 2023