प्रवाशांची ही डिमांड कधीच पूर्ण करत नाहीत एअर होस्टेस, कुणी विचारणा केली तरी देतात नकार!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 03:09 PM2024-11-05T15:09:13+5:302024-11-05T15:27:24+5:30
अमेरिकेतील एका माजी एअर होस्टेसने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉकवर प्रवाशांच्या एका अशा मागणीबाबत सांगितलं ज्या त्या कधीच पूर्ण करीत नाहीत.
विमानाने प्रवास करणं हा एक फारच वेगळा अनुभव असतो. विमानातील एअर होस्टेस आपल्या मदतीसाठी हजर असतात. सामान्यपणे एअर होस्टेस प्रवाशांना सगळ्याच कामात मदत करतात. पण एक अशी डिमांड असते ज्यासाठी त्या नकार देतात. याचा खुलासा एका एअर होस्टेसने केला आहे.
न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेतील एका माजी एअर होस्टेसने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉकवर प्रवाशांच्या एका अशा मागणीबाबत सांगितलं ज्या त्या कधीच पूर्ण करीत नाहीत. तिने या गोष्टीचं कारण देखील सांगितलं आहे. आता ही महिला एअर होस्टेस राहिली नसून सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर झाली आहे. सोशल मीडियावर ती तिचे व्हिडीओ पोस्ट करत असते.
कॅट कमलानीने 6 वर्ष एअर होस्टेस म्हणून काम नोकरी केली आहे. टिकटॉकवर तिचे १ मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तिने सांगितलं की, त्या प्रवाशाची कोणती मागणी मानत नाहीत.
ती म्हणाली की, अनेकदा प्रवासी फ्लाइटच्या कॅबिनमध्ये त्यांच्यासोबत बॅग घेऊन येतात. ज्या त्या सीटच्या वरच्या लॉकलरमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांना त्या व्यवस्थित ठेवता येत नाही किंवा अॅडजस्ट करू शकत नाहीत. अशात प्रवासी बॅग ठेवण्यासाठी एअर होस्टेसला बोलवतात. कॅटने सांगितलं की, या बॅग ठेवण्याचं काम एअर होस्टेसच्या कामाचा भाग नाही. ही लोकांची स्वत:ची जबाबदारी असते.
कॅटने सांगितलं की, एअर होस्टेस तुमची मदत करू शकतात. पण गरजेचं नाही की, त्यांनी तुमचं ऐकायलाच हवं. ती म्हणाली की, अमेरिकन एअरलाईन्स विमानांमध्ये एक चिन्ह लावलेलं असतं ज्यात दाखवण्यात आलेलं असतं की, लॉकरमध्ये बॅग कशी ठेवावी.