VIDEO : बाइकच्या मदतीने ऊसाचा रस काढण्याचा अजब जुगाड, 15 सेकंदात निघतो 1 ग्लास रस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 06:28 PM2022-07-01T18:28:04+5:302022-07-01T18:32:00+5:30
Social Viral : ट्विटरवर RANDOM FACTS नावाच्या अकाऊंटवर हा 13 सेकंदाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, लोकांनी एक लाकडाची एक मशीन तयार केली आहे.
Social Viral : उन्हाळ्यात तापत्या उन्हात ऊसाचा रस पिण्याची वेगळी मजा असते. याची टेस्ट तर चांगली असतेच सोबतच याचे आरोग्यालाही अनेक फायदे होतात. त्यामुळे या दिवसात जास्तीत जास्त लोक दिवसाची सुरूवात ऊसाच्या थंडगार रसाने करतात. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, ऊसाचा रस कुणी हाताने काढतं किंवा मशीनला मोटर लावून रस काढला जातो. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्या ऊसाचा रस काढण्याचा वेगळाच जुगाड बघायला मिळाला.
ट्विटरवर RANDOM FACTS नावाच्या अकाऊंटवर हा 13 सेकंदाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, लोकांनी एक लाकडाची एक मशीन तयार केली आहे. मशीनीप्रमाणे यातही लोक रस काढण्यासाठी ऊस लावताना दिसत आहे. पण ही मशीन चालते कशी हे बघून जास्त लोक हैराण झाले आहेत. व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एक व्यक्ती बाइकवर बसली आहे आणि तो बाइक एक राऊंड मारतो. बाइकने एक राऊंड मारल्यावर भांड्यात ऊसाचा रस निघत आहे. अशाप्रकारे काही सेकंदातच ऊसाचा भरपूर रस निघत आहे.
Innovative way to extract sugarcane juice🥤🥤🥤 pic.twitter.com/imqvRr7MNJ
— RANDOM FACTS (@RANDOMFACTS2022) June 16, 2022
ऊसाचा रस काढण्याचा जुगाड असलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 99.9 के व्ह्यूज मिळाले आहेत. लोक या व्हिडीओवर अनेक मजेदार कमेंट्स करत आहेत. कुणी याला जबरदस्त जुगाड म्हणत आहेत तर कुणी याला पेट्रोलची नासाडी म्हणत आहेत.