Find Out Mount Everest: चॅलेंज! या फोटोतून माउंट एव्हरेस्ट शोधून दाखवा; नासाचे अंतराळवीरही गांगरले...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 03:31 PM2022-01-13T15:31:40+5:302022-01-13T15:34:03+5:30

Find Out Mount Everest Challenge: माउंट एव्हरेस्ट हा चीन आणि नेपाळच्या दरम्यान हिमालय पर्वत रागांमध्ये स्थित आहे आणि मानवाने 1953 मध्ये पहिल्यांदा हा पर्वत सर केला होता. संपूर्ण हिमालय बर्फाच्या चादरीत झाकल्याचे या चित्रात दिसत आहे.

Eye Challenge! find out hidden Mount Everest from this photo; NASA astronauts post it | Find Out Mount Everest: चॅलेंज! या फोटोतून माउंट एव्हरेस्ट शोधून दाखवा; नासाचे अंतराळवीरही गांगरले...

Find Out Mount Everest: चॅलेंज! या फोटोतून माउंट एव्हरेस्ट शोधून दाखवा; नासाचे अंतराळवीरही गांगरले...

Next

देशातील सर्वात उंच पर्वत कोणता? तुम्ही उत्तर द्याल माउंट एव्हरेस्ट. खरेच आहे. हा माउंट एव्हरेस्ट येतो नेपाळमध्ये. नेपाळ सरकारने मोजलेल्या उंचीनुसार हा पर्वत 29,032 फूट उंच आहे. कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊन काळात म्हणे हा माउंट एव्हरेस्ट भारतातून खूप दूरवरून देखील दिसत होता. हवा स्वच्छ होती. पण हाच माउंट एव्हरेस्ट तुम्हाला नासाने काढलेल्या फोटोत शोधता येतोय का पहा...

तुम्ही कधी विचार केलाय का? अंतराळातून या माउंट एव्हरेस्ट कसा दिसत असेल? हिमालय पर्वतरांगा कशी दिसत असेल? नासाच्या अंतराळवीरांनी पृथ्वीपासून ४०० किमी उंचीवरून माऊंट एव्हरेस्टचा अद्भूत फोटो काढला आहे. त्यांनी ट्विट करून लोकांना चॅलेन्ज दिलेय, या फोटोत एव्हरेस्टला शोधून दाखवा.

माउंट एव्हरेस्ट हा चीन आणि नेपाळच्या दरम्यान हिमालय पर्वत रागांमध्ये स्थित आहे आणि मानवाने 1953 मध्ये पहिल्यांदा हा पर्वत सर केला होता. संपूर्ण हिमालय बर्फाच्या चादरीत झाकल्याचे या चित्रात दिसत आहे. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरून माउंट एव्हरेस्ट एखाद्या झाडासारखा दिसतो ज्याची मुळे जमिनीवर पसरलेली असतात. या सगळ्यात मध्यभागी नजर टाकली तर त्यात एव्हरेस्ट दिसतो. एप्रिलमध्ये मार्क टी वंदे हेई हे स्पेस स्टेशनवर आले होते. हा फोटो हेई यांनीच पोस्ट केला आहे. 

माउंट एव्हरेस्टची उंची 8844 मीटर
माउंट एव्हरेस्टची उंची प्रथम 1856 मध्ये 8840 मीटर एवढी मोजण्यात आली होती. 1955 मध्ये त्याची उंची 8848 मीटर असल्याचे आढळून आले, जी अजूनही नेपाळ सरकारने सांगितलेली अधिकृत उंची आहे. तथापि, आणखी एक गोष्ट आहे की चीनने माउंट एव्हरेस्टची उंची 8844 मीटर असल्याचे घोषित केले आहे. शास्त्रज्ञ सध्या जगातील सर्वात उंच पर्वताचे पुन्हा मोजमाप करण्याच्या प्रक्रियेत आहेत, विशेषत: 2015 च्या भूकंपानंतर उंची बदलली असावी, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

जर तुम्हाला माउंट एव्हरेट्स सापडला नसेल तर खाली फोटो देत आहोत...

Web Title: Eye Challenge! find out hidden Mount Everest from this photo; NASA astronauts post it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :NASAनासा