Eye test: शोधाल तर सापडेल! या फोटोत दडलाय एक प्राणी, तुमची नजर असेल तीक्ष्ण तर दाखवा शोधुन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 12:54 PM2022-03-09T12:54:42+5:302022-03-09T12:59:07+5:30
एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, जो चांगलाच चर्चेत आला आहे. समुद्र लाटांप्रमाणे रेषा असलेला हा फोटो आहे.
सोशल मीडियावर असे बरेच फोटो व्हायरल होत असतात (Opticall illusion photos) जे पाहून तुम्ही कन्फ्युझ होता. काही फोटो विचित्र आकार असतो किंवा विचित्र डिझाइन असते. ज्यामध्ये काही ना काही दडलेलं असतं. याला ऑप्टिकल इल्युझन असं म्हणतात. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, जो चांगलाच चर्चेत आला आहे. समुद्र लाटांप्रमाणे रेषा असलेला हा फोटो आहे.
या फोटोत फक्त काळ्या-पांढऱ्या रंगाच्या कोन असलेल्या रेषा दिसत आहेत (White Black lines photo showing optical illusion). तसं या फोटोत तुम्हाला काय खास दिसतं आहे असं विचारलं तर तुम्ही फक्त या रेषाच तर आहेत, यात कुठे काय खास आहे, असंच म्हणाल. पण नाही या काळ्या-पांढऱ्या रेषांमध्ये मोठा राज डला आहे. तुम्ही जर नीट आणि एका खास पद्धतीने फोटो पाहाल तर तुमच्यासमोर हा राज उलगडेल.
आता एरवी तुमच्यासमोर असा विचित्र फोटो आला की त्या फोटोकडे तुम्हाला एकटक पाहायचं असतं, तेव्हा तुम्हाला त्यात काहीतरी वेगळं दिसतं आहे. या फोटोत तुम्ही तसं एकटक पाहिलं तर तुम्हाला काहीच दिसणार नाही. या फोटोकडे स्थिर नजरेने पाहूच नका. तर तुमचं डोकंल हलवा (Shaking Head lets you see optical illusion). आपण जशी नकारार्थी मान हलवतो, तशीच मान तुम्हाला हलवायची. डाव्या-उजव्या बाजूला डोकं हलवायचं आहे आणि मग पाहा चमत्कार.
हळूच या काळ्या-पांढऱ्या रेषांमधील चट्टे तुम्हाला दिसतील आणि हळूहळू दोन कान आणि चेहराही दिसू लागेल. आता तुम्हाला तो चेहरा स्पष्टपणे दिसेल. दिसला हा चेहरा कुणाचा आहे. याचं उत्तर आधी तुम्ही आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट ब़ॉक्समध्ये नक्की द्या. या फोटोत आहे तो चक्क एक झेब्रा. काय मग तुम्हालाही तोच दिसला ना? आता या फोटोचं चॅलेंज तुम्ही तुम्ही इतरांनाही द्या. ही बातमी नक्की शेअर करा.