'परत आलीस तर जेलमध्ये पाठवेन', रेमडेसिविरसाठी महिला CMO च्या पाया पडायला गेली, अन् मग.... 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 02:15 PM2021-04-28T14:15:03+5:302021-04-28T14:27:23+5:30

covid19 patients touch feet of chief medical officer : कोणीतरी या घटनेचा व्हिडिओ बनविला आणि ट्विटर आणि फेसबुकवर व्हायरल झाला. लवकरच ट्विट व व्हिडिओवर सीएमओ ट्रोल होऊ लागले.

Families of covid19 patients touch feet of chief medical officer cmo requesting him be provided remdesivir | 'परत आलीस तर जेलमध्ये पाठवेन', रेमडेसिविरसाठी महिला CMO च्या पाया पडायला गेली, अन् मग.... 

'परत आलीस तर जेलमध्ये पाठवेन', रेमडेसिविरसाठी महिला CMO च्या पाया पडायला गेली, अन् मग.... 

googlenewsNext

सर्वच राज्यातील सरकारने जनतेला आश्वासन दिले आहे की रेमाडेसिविरसारख्या औषधांची कमतरता नाही, परंतु परिस्थिती वेगळी आहे. मंगळवारी दुपारी तीन महिला नोएडा सेक्टरमधील सीएमओ कार्यालयात  रेमडेसिविरसाठी मदत माागण्यास मुख्य वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे गेल्या होत्या. यावेळी, कार्यालयात पोहोचलेल्या महिलांनी सीएमओ डॉ. दीपक ओहरी यांच्या पाया पडून  रुग्णांना रेमडेसिवीर मिळवून देण्याबाबत विचारणा केली. पण सीएमओ त्यांचा रिपोर्ट घेऊन आश्वासन देत पुढे निघून गेले. 

blockquote class="twitter-tweet">

#WATCH Noida | Families of #COVID19 patients touch the feet of Chief Medical Officer (CMO) Deepak Ohri, requesting him that they be provided with Remdesivir.

(27.04.2021) pic.twitter.com/zX4ne027Mr

— ANI UP (@ANINewsUP) April 28, 2021

कोणीतरी या घटनेचा व्हिडिओ बनविला आणि ट्विटर आणि फेसबुकवर व्हायरल झाला. लवकरच ट्विट व व्हिडिओवर सीएमओ ट्रोल होऊ लागले.  हा व्हिडीओ पाहून लोकांना संताप अनावर झाला आहे.  त्याचवेळी अनुभव श्रीवास्तव यांनी ट्विटरवर लिहिले की अधिकारी देवच असतो. शिव त्यागी लिहितात की जनता असहाय्य आहे, मदतीसाठी बाजू मांडण्याशिवाय काहीच उरले नाही. त्यांनी या प्रकरणात सीएमओशी बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी कॉल उचलला नाही आणि फोन डिस्कनेक्ट केला.

PPE किट्स घातलेला अँम्ब्युलन्स ड्रायव्हर लग्नाच्या वरातीत शिरला; भन्नाट डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला
 

जेलमध्ये पाठवण्याचा केला आरोप

कोविड १९ रुग्ण  महिला गौतमबुद्ध नगरच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) कार्यालयात  रेमडेसिविर इंजेक्शनच्या मागण्यासाठी गेली होती. कार्यालयात गेल्यानंतर या महिलेला जेलमध्ये पाठवण्याची धमकी देण्यात आली. रेमडेसिविर इंजेक्शन मागण्यासाठी ही महिला सात-आठ इतर लोकांसह जेव्हा सीएमओच्या कार्यालयात गेली तेव्हा ही घटना घडली. हे लोकदेखील  रेमाडेसिविर शोधत होते.

आधी बघण्याचा कार्यक्रम, साखरपूडाही केला; नंतर म्हणतो मुलीच्या डोळ्यात दोष, मुलीकडच्यांनी चोप चोप चोपला

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत तिन्ही महिलांनी सीएमओ दीपक ओहरी यांचे पाय पडून इंजेक्शन देण्याची विनंती केली. ती महिला म्हणाली की, "आम्ही येथे (रेमडेसिविर) इंजेक्शनसाठी आलो होतो आणि ते म्हणाले की ते उपलब्ध होईल तेव्हा दिले जाईल. मी परत येईन असे सांगितले तेव्हा मला सांगण्यात आले की मी परत आल्यास मला तुरूंगात पाठविले जाईल.''  यासंदर्भात सीएमओ किंवा जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेले नाही.
 

Web Title: Families of covid19 patients touch feet of chief medical officer cmo requesting him be provided remdesivir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.