जबरा फॅन! मायकल जॅक्सनसारखं दिसण्यासाठी केल्या ११ सर्जरी, २१ लाख रूपये केले खर्च!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 04:02 PM2019-01-28T16:02:13+5:302019-01-28T16:04:00+5:30
'किंग ऑफ पॉप' मायकल जक्सन हा गेल्यावरही त्याच्या चाहत्यांमध्ये जराही कमतरता आलेली दिसत नाही. उलट त्याचे फॅन्स वाढतच आहेत.
'किंग ऑफ पॉप' मायकल जक्सन हा गेल्यावरही त्याच्या चाहत्यांमध्ये जराही कमतरता आलेली दिसत नाही. उलट त्याचे फॅन्स वाढतच आहेत. आजही लाखो फॅन्स त्याचासारखा डान्स करण्याचा प्रयत्न करत असतात. असे अनेक चाहतेही आहेत जे त्याच्यासारखे दिसतातही. त्यातील एक आहे लिओ ब्लॅंको. २२ वर्षीय लिओने असं काही केलं आहे की, यामुळे तो मायकल जॅक्सनसारख्या कित्येक चेहऱ्यांपेक्षा वेगळा ठरतो. लिओने गेल्या ७ वर्षात मायकल जॅक्सनसारखं दिसण्यासाठी स्वत:वर २१ लाख रूपयांपेक्षाही जास्त रक्कम खर्च केली आहे.
मायकल जॅक्सनचे फॅन्स असेच आहेत. ते काहीही करतात. लिओ मायकलचा बालपणापासून मोठा फॅन आहे. १५ वर्षाचा झाला असतानाच त्याने ठरवले होते की, त्याला मायकल जॅक्सनसारखं दिसायचं आहे. गेल्या ७ वर्षात त्याने एक दोन नाही तर चक्क ११ प्लास्टिक सर्जरी केल्यात. तो अजूनही थांबला नाहीये, त्याला अजूनही वाटतं की, तो स्वत:मध्ये काही बदल करू शकतो.
लिओने एका मुलाखतीत सांगितले की, 'मी गेल्या ७ वर्षात प्लास्टिक सर्जरी आणि कॉस्मेटिकसारख्या प्रक्रियांमध्ये ३० हजार डॉलर इतका खर्च केलाय'. भारतीय मुद्रेत ही रक्कम २१ लाख २७ हजार इतकी होते.
मायकल जॅक्सनसाठी लिओचं हे वेड पाहून त्याचं चाहत्यांकडून कौतुक केलं जात आहे. पण त्याच्या घरचे लोक यामुळे जरा त्रासलेले आहेत.
सर्जरी आणि कॉस्मेटिक प्रोसेसच्या माध्यमातून लिओने स्वत:त अनेक बदल केले आहे. आता तो मायकल जॅक्सनचा डुप्लिकेट वाटतो तर आहे. पण त्याला काही बदल करण्याची गरज आहे. यासाठी तो आणखी प्रयत्न करणार आहे.