नारळाच्या झाडावर चढण्यासाठी जुगाडू बाइक, बघाल तर म्हणाल रायडर आहे की शेतकरी!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2019 04:09 PM2019-06-04T16:09:52+5:302019-06-04T16:10:47+5:30

सध्या सोशल मीडियात एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात नारळाच्या झाडावर चढण्यासाठी जी पद्धत वापरली आहे ती कधी पाहिली नसणार.

Farmer creates ingenious device to carry him up trees to pick coconuts | नारळाच्या झाडावर चढण्यासाठी जुगाडू बाइक, बघाल तर म्हणाल रायडर आहे की शेतकरी!

नारळाच्या झाडावर चढण्यासाठी जुगाडू बाइक, बघाल तर म्हणाल रायडर आहे की शेतकरी!

Next

नारळाच्या झाडावर कसं चढलं जातं हे तुम्ही अनेक सिनेमांमध्ये पाहिलं असेलच. पण सध्या सोशल मीडियात एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात नारळाच्या झाडावर चढण्यासाठी जी पद्धत वापरली आहे ती कधी पाहिली नसणार. या काकांनी केलेला हा जुगाड नारळाच्या झाडांवर चढणाऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. सध्या सोशल मीडियात या व्हिडीओला मोठा प्रतिसाद मिळत असून लोकांकडून या काकांचं कौतुकही केलं जात आहे. 


हा व्हिडीओ Bade Chote नावाच्या ट्विटर यूजरने शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं आहे की, 'जेव्हा तुम्हाला बाईक रेसर व्हायचं असतं, पण तुम्ही शेतकरी होता....'.









काही दिवसांपूर्वी 'महिंद्रा अ‍ॅन्ड महिंद्रा' कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता. या एक शेतकरी भूसा एकत्र करण्यासाठी जेसीबी मशीनच्या जागी ट्रॅक्टरला खाच बांधून आपल्या जुगाडू मशीनचा वापर करत आहे.

Web Title: Farmer creates ingenious device to carry him up trees to pick coconuts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.