अरे व्वा! केळ्याचा कचरा ठरला उत्पन्नाचं साधन; हजारो महिलांना 'असा' मिळाला रोजगार
By manali.bagul | Published: September 24, 2020 12:55 PM2020-09-24T12:55:52+5:302020-09-24T13:13:12+5:30
२५ वर्षीय वैशाली या केळ्याच्या कचऱ्यापासून उत्पन्न मिळवतात. इतकंच नाही तर त्यांनी जवळवपास हजारो महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
(Image Credit- New Indian Express)
कोणत्याही वस्तूंचा किंवा खाद्यपदार्थांचा कचरा आपण नेहमी फेकून देतो. पण हाच कचरा हजारो लोकांच्या उत्पन्नाचं साधन ठरू शकतो, असा तुम्ही कधी विचारही केला नसेल. आज आम्ही तुम्हाला कचऱ्याचा वापर करून आत्मनिर्भर झालेल्या महिलांबद्दल सांगणार आहोत. बिहारच्या हाजीपूर येथे चांगल्या दर्जाची केळी उपलब्ध असतात. या केळ्यांचा वेगवेगळ्या प्रकारचा कचरा निर्माण होतो. कचरा आपण नेहमी फेकून देतो कारण त्याचा काहीही उपयोग नसतो. पण २५ वर्षीय वैशाली या केळ्याच्या कचऱ्यापासून उत्पन्न मिळवतात. इतकंच नाही तर त्यांनी जवळपास हजारो महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
न्यू इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार वैशाली फॅशनशी निगडीत क्षेत्रात काम करत असल्यामुळे या कचऱ्याला ते युरोपपर्यंत पोहोचवतात. या फायबरपासून कपडे आणि इतर फॅशनेबल साहित्य तयार केले जाते. वैशाली यांनी या महिलांना फॅशनबेस्ड स्किल ट्रेनिंगसुद्धा दिलं आहे. स्थानिक कृषी विज्ञान केंद्राच्या निमित्तानं वैशाली यांनी एक प्रकल्प सुरू केला आहे. 'सुरमई बनाना एक्स्ट्रेशन प्रोजेक्ट' असं या प्रकल्पाचं नाव आहे. वैशाली यांनी दिलेल्या माहितीनुसार याअंतर्गत जास्तीत जास्त महिलांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. दिवसेंदिवस या प्रकल्पाअंतर्गत महिलांचा सहभाग वाढत चालला आहे.
Video : बापरे! गाडीच्या चाकामध्ये अकडला १४ फुट लांब अजगर; पाहा 'कसा' बाहेर काढला
कपड्यांसाठी या फायबरचा उपयोग
वैशाली यांनी दिलेल्या माहितीनुसार ''या महिलांना केळ्याच्या झाडापासून मिळत असलेल्या कच्च्या मालापासून उत्पादनं तयार करण्यासाठी प्रशिक्षण दिलं जात आहे. या फायबर्सचा वापर कपडे तयार करण्यासाठी केला जातो. हाजीपूर येथे उत्तम दर्जाच्या केळ्यांचे उत्पादन केलं जातं हे मला लहानपणापासूनच माहिती होते. केळ्याची पीकं काढून टाकल्यानंतर मोठ्या प्रमाणात कचरा तयार होतो. हाच कचरा उत्पादनं तयार करण्यासाठी फायदेशीर ठरतो.''
जिद्दीला सलाम! कॅन्सरवर मात केली; लकव्यामुळे उभं राहणं कठीण, तरीही 'बॉडी बिल्डर' बनला
अजून उत्पादन वाढवता येऊ शकतं
मनुष्यबळाच्या साहाय्याने केळ्याचे पीक, पल्प, फायबर्स यांचे उत्पादन वाढवता येऊ शकते. डॉ. नरेंद्र कुमार हे जेष्ठ कृषी तज्ज्ञ असून त्यांनीही या महिलांना दोन दिवसांचे ट्रेनिंग दिले होते. केळ्यापासून तयार होणारा कचरा हा सगळ्यात मजबूत फायबर्सपैकी एक आहे. याचा वापर दोरी, चटई, कपडे, हाताने तयार केलेला कागद, वुलन फॅबरिक्स तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो.
मानलं गड्या! लॉकडाऊनमध्ये पठ्ठ्यानं बनवली भन्नाट सायकल; अन् हजारो रुपयांना होतेय विक्री