रातोरात नशीब बदलले! 'या' व्यक्तीला २५ वर्षांपर्यंत दरमहा ५.६ लाख रुपये मिळणार; नेमकं प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 10:53 AM2023-10-23T10:53:50+5:302023-10-23T10:54:57+5:30
तमिळनाडुमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला प्रत्येक महिन्याला ५.६ लाख रुपये मिळणार आहेत.
आपल्याकडे कधी कोणाचं नशीब बदलेलं सांगता येत नाही. तमिळनाडू येथील एका व्यक्तीच नशीब रातोरात बदलले आहे. या व्यक्तीला महिन्याला ५.६ लाख रुपये मिळणार आहेत, मगेश कुमार नटराजन असे या व्यक्तीचे नाव आहे. संयुक्त अरब अमिराती युएईमध्ये गेल्यावर त्यांनी लॉटरी खेळली. आता एका ड्रॉमध्ये त्याने जॅकपॉट जिंकला आहे. तसेच हे भव्य पारितोषिक जिंकणारा तो UAE बाहेरील पहिला व्यक्ती ठरला आहे. त्यांना पुढील २५ वर्षे प्रत्येक महिन्याला ५.६ लाख रुपये मिळणार आहेत.
Maharashtra: दोन वादळे, मात्र राज्यात पावसाची शक्यता नाहीच; हवामानशास्त्रज्ञांचा अंदाज
नटराजन हे भारतीय प्रकल्प व्यवस्थापक आहेत. ते २०१९ मध्ये कामासाठी UAE ला गेले होते आणि ४ वर्षे इथे राहिले होते. या वर्षाच्या सुरुवातीपर्यंत ते यूएईमध्येच होते. यावेळी त्यांनी एमिरेट्स ड्रॉचा FAST5 ग्रँड प्राइज गेम खेळला. आता त्यांना दरमहा मोठी रक्कम मिळणार आहे. नटराजन हे तामिळनाडूतील अंबुरचे रहिवासी आहेत. 'भव्य पारितोषिक जिंकल्यानंतर सुरुवातीला त्यांचा विश्वासच बसत नव्हता. मग जेव्हा त्यांना एमिरेट्स ड्रॉ वरून कॉल आला, तेव्हा ते नवीन विजेता बनल्याची खात्री पटली.
माध्यमांशी बोलताना नटराजन म्हणाले, 'मी माझ्या आयुष्यात आणि अभ्यासादरम्यान अनेक आव्हाने पाहिली आहेत. माझा अभ्यास पूर्ण करण्यासाठी समाजातील अनेकांनी मला मदत केली. आता ते सर्व समाजाला परत देण्याची माझी वेळ आली आहे. समाजातील माझे योगदान गरजू लोकांपर्यंत पोहोचेल याची काळजी घेईन. नटराजन यांना दोन मुलीही आहेत. नटराजन सांगतात की, समाजासाठी योगदान देण्यासोबतच ते त्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठीही गुंतवणूक करणार आहेत. 'तो एक अविश्वसनीय क्षण होता, जो माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा आणि संस्मरणीय क्षण बनला आहे. मी माझ्या मुलींच्या शिक्षणासाठी आणि कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे.