मुलीसाठी काय पण..! डान्स स्टेप्स विसरू नये म्हणून बाप सोबतच नाचला, तुम्हीही कौतूक कराल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 20:39 IST2023-02-08T20:39:31+5:302023-02-08T20:39:58+5:30

Trending News: मुलगी शाळेतील कार्यक्रमात नाचत होती अन् वडील तिला अनोख्या पद्धतीने मदत करत होते.

Father Daughter Viral Video: father danced along with daughter in school function | मुलीसाठी काय पण..! डान्स स्टेप्स विसरू नये म्हणून बाप सोबतच नाचला, तुम्हीही कौतूक कराल

मुलीसाठी काय पण..! डान्स स्टेप्स विसरू नये म्हणून बाप सोबतच नाचला, तुम्हीही कौतूक कराल


Father Daughter Viral Video: सोशल मीडियावर दररोज एकापेक्षा एक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ खूपच मजेशीर असतात, जे नेटकऱ्यांना पोटधरुन हसवतात, तर काही व्हिडिओ अतिशय भावूक असतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही खूप आवडेल. 

या व्हिडिओमध्ये एक वडील आपल्या मुलीला डान्समध्ये मदत करतान दिसत आहेत. हा व्हिडिओ एका शालेय कार्यक्रमाचा, जिथए एक मुलगी स्टेजवर इतर मुलींसोबत नाचताना दिसत आहे. यावेळी मुलगी आपल्या डान्स स्टेप्स विसरू नये, यासाठी वडील स्टेजसमोर बसून मुलीसोबत डान्स करत आहेत.

 

आई-वडलांसाठी त्यांच्या मुलांपेक्षा मोठी संपत्ती कुठलीच नाही. आपल्या मुलाने प्रत्येक क्षेत्रात चांगली कामगिरी करावी आणि आपल्यापेक्षा उच्च स्थान मिळवावे अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. या व्हिडिओमध्ये हे वडील आपल्या मुलीला अनोख्या पद्धतीने मदत करताना दिसत आहेत. हा व्हायरल व्हिडिओ पाहून प्रत्येकजण त्या व्यक्तीचे कौतूक करत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 5 लाख 27 हजारांपेक्षा जास्तवेळा पाहिला गेला आहे.  आयपीएस ऑफिसर दीपांशु काबरा यांनी हा व्हिडिओ ट्विटर हॅडलवर सेअर केला आहे.

Web Title: Father Daughter Viral Video: father danced along with daughter in school function

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.