लेकीची माया! "पप्पा, उपाशी राहून काम करतात..."; रडणाऱ्या मुलीचा हृदयस्पर्शी Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 05:00 PM2023-10-20T17:00:52+5:302023-10-20T17:02:41+5:30

सोशल मीडियावर बाप-लेकीच्या प्रेमाचा एक हृदयस्पर्शी व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मुलगी आपल्या वडिलांची काळजी करत रडताना दिसत आहे.

father did not eat the food cute little girl started crying watch emotional viral video | लेकीची माया! "पप्पा, उपाशी राहून काम करतात..."; रडणाऱ्या मुलीचा हृदयस्पर्शी Video व्हायरल

लेकीची माया! "पप्पा, उपाशी राहून काम करतात..."; रडणाऱ्या मुलीचा हृदयस्पर्शी Video व्हायरल

मुलींचा आपल्या वडिलांवर खूप जास्त जीव असतो. तिच्यासाठी तिचे बाबा हे सुपरहिरो असतात. अशातच सोशल मीडियावर बाप-लेकीच्या प्रेमाचा एक हृदयस्पर्शी व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मुलगी आपल्या वडिलांची काळजी करत रडताना दिसत आहे. हा व्हिडीओ जुना असला तरी सोशल मीडियावर पुन्हा एकदा तुफान व्हायरल होत आहे.

व्हिडीओ लोकांचं लक्ष वेधून घेत आहे, लोक तो पाहून भावूक होत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसणारी ही चिमुकली एखाद्या गोष्टीसाठी किंवा खेळण्यांसाठी नाही तर आपल्या वडिलांची आठवण काढून रडत आहे. ती आपल्या वडिलांची काळजी करत आहे. मुलीच्या निरागसतेची आता चर्चा रंगली आहे. 

व्हिडिओमध्ये मुलगी रडत म्हणत आहे की, पप्पा संध्याकाळपर्यंत उपाशी राहतात. काहीही खात नाहीत. व्हिडिओमध्ये मुलीचं वडिलांवरचं प्रेम पाहून तुमचं डोळे भरून येतील. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल की, म्हणूनच मुली या वडिलांच्या लाडक्या असतात. एवढ्या लहान वयात वडिलांची काळजी फक्त मुलगीच समजू शकते. 

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर @ChapraZila नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, जो खूप वेळा पाहिला आणि लाईक केला जात आहे. व्हिडीओ शेअर करताना, "या मुली आहेत, किती गोंडस बाहुल्या आहेत आणि किती सुंदर विचार आहेत" असं कॅप्शन लिहिलं आहे. व्हिडीओ पाहणारे युजर्स त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  
 

Web Title: father did not eat the food cute little girl started crying watch emotional viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.