प्रजासत्ताक दिन २०२०: 'या' व्यक्तीचं नाव चक्क ‘छब्बीस जनवरी’असं ठेवलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2020 10:06 AM2020-01-26T10:06:56+5:302020-01-26T10:12:07+5:30
आतापर्यंत तुम्ही अनेक नावं ऐकली असतील पण संपूर्ण देशाचं देश प्रेम उफाळून येईल असं नाव तुम्ही ऐकलंय का?
आतापर्यंत तुम्ही अनेक नावं ऐकली असतील पण संपूर्ण देशाचं देश प्रेम उफाळून येईल असं नाव तुम्ही ऐकलंय का?
मात्र जर एखाद्या व्यक्तीचे नाव त्याच्यासाठी अभिमान आणि समस्या असेल तर ही एक अतिशय सुंदर आणि विनोदी गोष्ट असेल अशीच एक घटना म्हणजे मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यात राहणार असलेल्या एका व्यक्तीचे नाव छब्बीस जनवरी ठेवले आहे. ऐकून अवाक् झालात ना? पण हे खरं आहे. आज आम्ही तुम्हाला या व्यक्तीचं नाव छब्बीस जनवरी का ठेवण्यात आलं हे सांगणार आहोत.
छब्बीस जनवरी हा व्यक्ती उत्तर प्रदेशातील मंदसौर येथे काम करणारा एक शासकीय अर्धकारी आहे. मात्र या त्यांना या नावामुळ खुप त्रास सहन करावा लागला. लोकांनी लहाणपणापासून त्यांच्या नावाची थट्टा केली. मात्र छब्बीस जनवरी यांना आपल्या नावाचा सार्थ अभिमान आहे. त्यांचे पूर्ण नाव छब्बीस जनवरी टेलर आहे. त्याचं वय ५२ असून त्यांना सर्व छब्बीस जनवरी या नावांना ओळखले जाते. त्यांच्या या आगळ्या वेगळ्या नावामागे खूप रंजक कथा आहे.
छब्बीस यांचे वडिल सत्यनारायण टेलर शिक्षक होते आणि २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी सकाळी शाळेत ध्वजारोहण करत होते. त्यावेळीच त्यांना कोणी तरी मुलगा झाल्याची आनंदाची बातमी दिली. याच आनंदात सत्यनारायण टेलर यांनी भावूक होऊन आपल्या मुलाचे नाव छब्बीस जनवरी ठेवले. मात्र या नावामुळं शाळेत असताना छब्बीस यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. त्यांना मस्करीत त्यांचे मित्र छब्बीस म्हणायचे. तर, काही लोक त्यांचे नाव ऐकून हसायचे.
कालांतराने शासकीय अधिकारी असलेल्या छब्बीस यांना आपल्या नावची सवय झाली आणि अभिमान वाटायला लागला. नंतर मग त्यांचे ऑफिशीयल किंवा शालेय आणि नंतच्या प्रवासात कागदोपत्री छब्बीस जनवरी नाव ठेवण्यात आले.