याला म्हणतात नशीब! एकाच गावातील २ जण रातोरात लखपती; मालामाल झाले मजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 04:22 PM2024-11-06T16:22:41+5:302024-11-06T16:27:53+5:30

स्वत:चं घर बांधण्याचा विचार केला होता आणि आता या पैशातून स्वप्न पूर्ण करणार आहे.

fazilka lottery winners lottery prize winners 4 lakh 2 lakh prize | याला म्हणतात नशीब! एकाच गावातील २ जण रातोरात लखपती; मालामाल झाले मजूर

प्रातिनिधिक फोटो

फाजिल्का येथे राहणाऱ्या दोघांनी लॉटरी जिंकली असून दोघेही लखपती झाल्याची घटना समोर आली आहे. फाजिल्का येथील एका व्यक्तीला साडेचार लाख रुपयांची लॉटरी लागली आहे. त्याच गावातील आणखी एका व्यक्तीला देखील लाखो रुपयांची लॉटरी लागली आहे. हे दोघे जण गेल्या चार वर्षांपासून लॉटरी जिंकत आहेत आणि यावेळी त्यांच्यापैकी एकाला साडेचार लाख तर दुसऱ्याला सव्वा दोन लाखांचं बक्षीस मिळालं आहे.

गेल्या चार वर्षांपासून लॉटरी जिंकत असून केवळ एक-दोन आकड्यांमुळे कोट्यवधी रुपयांचं बक्षीस जिंकण्यापासून वंचित राहिल्याचं तो सांगतात. मात्र सव्वा दोन लाखांचं बक्षीस मिळाल्याने खूश असल्याचं सांगितलं. स्वत:चं घर बांधण्याचा विचार केला होता आणि आता या पैशातून आपलं स्वप्न पूर्ण करणार आहे. या रकमेमुळे कुटुंबाला चांगलं जीवन आणि मुलांच्या शिक्षणासाठी मदत होणार असल्याचं सांगितलं. 

ही लॉटरी नागालँड स्टेट लॉटरीच्या स्टॉलवरून खरेदी करण्यात आली होती, जिथे ४.५ लाखांचं बक्षीस मिळालं. स्टॉल मालकाने सांगितलं की त्याच्या स्टॉलवर अनेकांनी लॉटरीचं तिकीट खरेदी केलं होतं आणि बक्षिसंही अनेक वेळा जिंकली होती, पण हे सर्वात मोठं बक्षीस आहे. स्टॉलवरही आनंदाचं वातावरण असून, बक्षिसं जिंकणाऱ्यांचं त्यांनी अभिनंदन केलं.

लॉटरी स्टॉल मालक खूप खूश आहेत, ज्यांनी स्वतः बक्षिसं जिंकणाऱ्यांना मिठाई देऊन त्यांचं तोंड गोड केलं. त्यांनी सांगितलं की, आता लॉटरी खरेदी करण्यासाठी आणखी लोक येतील याचा आनंद आहे. स्टॉल मालकाला असा विश्वास आहे की, जेव्हा लोकांना बक्षीस मिळतं, तेव्हा ते इतरांना देखील लॉटरी खरेदी करण्यासाठी प्रेरित करतात, ज्यामुळे आणखी मोठं बक्षीस जिंकण्याची शक्यता असते.
 

Web Title: fazilka lottery winners lottery prize winners 4 lakh 2 lakh prize

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.