TV अँकर हवामानाचे अपडेट देत होती तितक्यात स्क्रीनवर सुरू झाला Porn Video, मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 11:49 AM2021-10-20T11:49:02+5:302021-10-20T11:54:09+5:30
अनेक लोकांनी चॅनेलवर पॉर्न व्हिडीओ पाहिल्यानंतर त्याची तक्रार पोलिसांना दिली.
मागील वर्षभरापासून कोरोनानं सर्व जगासमोर मोठं संकट उभं केले आहे. कोरोनामुळे ऑनलाईन माध्यमांचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागला. मुलांचे शिक्षणही ऑनलाईन होऊ लागले. ऑफिसच्या मिटींगही ऑनलाईन झाल्या. परंतु या ऑनलाईन माध्यमांमुळे बऱ्याचदा अशा काही घटना घडल्या ज्या सर्वांसाठी चर्चेचा विषय बनल्या. आता अमेरिकेत एका न्यूज चॅनेलकडून घडलेल्या घटनेने सर्वांची बोलती बंद झाली आहे.
अमेरिकेत एक महिला न्यूज अँकर हवामानाचं अपडेट देत होती त्यावेळी स्क्रीनवर जे काही घडलं त्याने खळबळ माजली. ज्यावेळी अँकर हवामानाचं अपडेट देत होती तेव्हा अचानक स्क्रीनवर पॉर्न व्हिडीओ सुरू झाला. ही गोष्ट अँकरला माहिती नव्हती म्हणून तीचं काम सुरूच होतं. परंतु काही वेळाने एकाचं लक्ष स्क्रीनवर गेले तेव्हा तात्काळ व्हिडीओ बंद करण्यात आला. परंतु तोपर्यंत या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, अँकर कोडी प्रॉक्टर KREM News वर हवामानाचे अपडेट देत होती. परंतु तेव्हा तिच्या मागे असणाऱ्या स्क्रीनवर पॉर्न व्हिडीओ सुरू झाला. एँकर कोडीला या प्रकाराची जराही भनक नव्हती की तिच्या मागील स्क्रीनवर काय सुरू आहे. ती अपडेट देत राहिली. परंतु जेव्हा तिला माहिती पडलं मागे स्क्रीनवर पॉर्न व्हिडीओ सुरू आहे तेव्हा तिला मोठा धक्काच बसला.
चॅनेलने मागितली माफी
या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर टीव्ही चॅनेलच्या कार्यालयात सातत्याने फोन वाजू लागले. चॅनेलने घडलेल्या प्रकाराबद्दल प्रेक्षकांची माफी मागितली. भविष्यात अशाप्रकारे चूक होणार नाही या दिशेने आम्ही काम करू. हे नेमकं कुणामुळे आणि का घडलं याचा शोध घेतला जाईल. पण झालेल्या प्रकाराची आम्ही माफी मागतो असं चॅनेलने सांगितले.
पोलिसांनी मिळाली तक्रार
अनेक लोकांनी चॅनेलवर पॉर्न व्हिडीओ पाहिल्यानंतर त्याची तक्रार पोलिसांना दिली. ज्यावर स्पोकेन सिटी पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, १८ ऑक्टोबर KREM News चॅनेलवर पॉर्न व्हिडीओ चालवण्यात आला. त्याबाबत तक्रार प्राप्त झाली आहे. सध्या आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत. ही घटना हँकिंगची आहे की, चॅनेलमधील कुणी दोषी आहे याचा तपास केला जाईल.