खुर्चीसाठी काय पण! वर्गात दोन शिक्षिका भिडल्या; विद्यार्थ्यांसमोरच तुफान राडा, Video व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 04:02 PM2022-05-24T16:02:47+5:302022-05-24T16:08:52+5:30

दोन शिक्षिका खुर्चीवरून एकमेकींशी भिडल्या. शिक्षिका भांडत असल्याचं पाहून विद्यार्थ्यांना हसू आवरत नव्हतं. 

fight for chair in chitrakoot two teachers fought for chair in front of children video went viral | खुर्चीसाठी काय पण! वर्गात दोन शिक्षिका भिडल्या; विद्यार्थ्यांसमोरच तुफान राडा, Video व्हायरल 

खुर्चीसाठी काय पण! वर्गात दोन शिक्षिका भिडल्या; विद्यार्थ्यांसमोरच तुफान राडा, Video व्हायरल 

googlenewsNext

नवी दिल्ली - सोशल मीडियावर रोज नवनवीन व्हिडीओ हे व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ आता खूप व्हायरल होत आहे. मध्य प्रदेशच्या सतना जिल्ह्यातील चित्रकूटमध्ये दोन शिक्षिकांचं चक्क एका खुर्चीवरून भांडण झालं. या भांडणाचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विद्यार्थ्यांसमोरच तुफान राडा पाहायला मिळाला. दोन शिक्षिका खुर्चीवरून एकमेकींशी भिडल्या. शिक्षिका भांडत असल्याचं पाहून विद्यार्थ्यांना हसू आवरत नव्हतं. 

एक शिक्षिका ही खुर्ची माझीच आहे याची साक्ष देण्यासाठी साक्षीदार म्हणून एका विद्यार्थ्यालाच घेऊन आल्या. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रकूटच्या कंपोजिट शाळेच्या दोन शिक्षिकांचं भांडण व्हायरल झालं आहे. मुख्याध्यापिका पूजा गुप्ता आणि सहायक अध्यापिका प्रियंका शुक्ला यांच्यामध्ये खुर्चीवरून वाद झाला. भांडण सुरू असताना एक शिक्षिका थेट एका विद्यार्थ्यालाच पकडून घेऊन आली. "या खुर्चीवर मी बसते की नाही? तूच सांग" असा सवाल करत शिक्षिकेनं विद्यार्थिनीला साक्षीदार म्हणून उभं केलं. 

वर्गात सुरू असलेल्या हा अजब प्रकाप पाहून सर्व विद्यार्थी हसत होते. शिक्षिकांच्या भांडणाचा आनंद घेत होते. पंचायत सदस्य मनोज पांडे यांनी पूजा गुप्ता आणि प्रियंका शुक्ला यांच्यामध्ये वारंवार वाद होत असल्याचं सांगितलं आहे. त्यांनी याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. दोघींच्या भांडणाचा परिणाम मुलांच्या अभ्यासावर होतो. पूजा गुप्ता स्वत:च्या पतीला घेऊन शाळेत येतात. त्यांचे पती दिवसभर शाळेतच असतात. पूजा यांनी पतीला शाळेतील एक वर्ग राहण्यासाठी दिला असल्याची माहिती पांडेंनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

Web Title: fight for chair in chitrakoot two teachers fought for chair in front of children video went viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.