पायाखाली ठेवतो लाखों-कोट्यवधी रूपये, सोनं-हिऱ्यांनी झाकलेली असते याची बॉडी!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2019 01:45 PM2019-02-26T13:45:07+5:302019-02-26T13:55:37+5:30

फ्लॉयड मेवेदर हा एक लोकप्रिय अमेरिकन फायटर आहे. सोशल मीडियात त्याची लक्झुरिअस लाइफस्टाइल पाहून लोकांच्या मनात हाच विचार येईल की, त्यांचे अच्छे दिन कधी येतील?

Fighter Floyd Mayweather luxurious lifestyle he shows piles cash feet | पायाखाली ठेवतो लाखों-कोट्यवधी रूपये, सोनं-हिऱ्यांनी झाकलेली असते याची बॉडी!

पायाखाली ठेवतो लाखों-कोट्यवधी रूपये, सोनं-हिऱ्यांनी झाकलेली असते याची बॉडी!

googlenewsNext

फ्लॉयड मेवेदर हा एक लोकप्रिय अमेरिकन फायटर आहे. सोशल मीडियात त्याची लक्झुरिअस लाइफस्टाइल पाहून लोकांच्या मनात हाच विचार येईल की, त्यांचे अच्छे दिन कधी येतील? ४१ वर्षीय फ्लॉयड गोल्ड आणि किंमत डायंमडचं चालतं फिरतं दुकान आहे. म्हणजे त्याच्या हातापासून ते गळ्यापर्यंत केवळ सोनं आणि हिरेच बघायला मिळतात. 

११ फेब्रुवारीला फ्लॉयडने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यात तो त्याची श्रीमंती दाखवत होता. हा व्हिडीओ ९ कोटी लोकांना पाहिला. यात दिसतंय की, फ्लॉयड एका सोन्याच्या मगमधून ड्रिंक घेतो. तसेच त्याच्याकडची महागडी ज्वेलरी सुद्धा तो दाखवतो आहे. इतकेच नाही तर त्याच्या पायाखाली त्याने लाखो रूपये ठेवले आहेत. 

फ्लॉयड हा नेहमीच त्याच्याकडे भरपूर कॅश ठेवतो. मग तो जेवत असो, प्रवास करत असो वा बेडवर झोपलेला असो. तो स्ट्रिप क्लबमध्ये जाऊन रोज लाखों रूपये सुद्धा उडवून येतो. 

रिपोर्टनुसार, ऑगस्ट २०१७ मध्ये फ्लॉयडन सर्वात महागड्या फाइटमध्ये मिक्स्ड मार्शल आर्ट्सचा सुपरस्टार कोनोर मॅकग्रेगोरला मात देऊन ५०वा विजय नोंदवला होता. या सामन्यातील विजयानंतर त्याला ६५० कोटी रूपये मिळाले होते. तेच २०१५ मध्ये फ्लॉयडने एका फाइटमधून २०० मिलियन डॉलर मिळवले होते. 

फ्लॉयडने अल्टीमेट फायटिंगचा किंग मानला जातो. त्याच्याकडे इतका पैसा आहे की, कधीकधी बॅंकेतून पैसे आणण्यासाठी त्याला ट्रकचा वापर करावा लागतो. रिपोर्ट्सनुसार, त्याची एकूण संपत्ती ५६० मिलियन डॉलर म्हणजे ४ हजार कोटी रूपयांची आहे. 

Web Title: Fighter Floyd Mayweather luxurious lifestyle he shows piles cash feet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.